T20 World Cup मध्ये भारत सेमीफायनलपर्यंतही पोहचणार नाही; कपिल देवची भविष्यवाणी

कपिल देव यांनी भाकीत केले आहे की, यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचले तरी ते खूप मोठे असेल.
T20 World Cup मध्ये भारत सेमीफायनलपर्यंतही पोहचणार नाही; कपिल देवची भविष्यवाणी

भारतीय संघाने 2022 च्या टी-20 विश्वचषकाची सुरुवात चांगली केली आहे. याआधीच सराव सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सराव सामना खेळायचा आहे. यावेळी टीम इंडियाला विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार मानला जात असला तरी 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवचा अंदाज काही वेगळंच सांगत आहे.

कपिल देव यांनी भाकीत केले आहे की, यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचले तरी ते खूप मोठे असेल. ते म्हणाले की, टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे. भारतीय संघ टॉप-4 मध्ये पोहोचण्याची शक्यता फक्त 30% आहे. हा अंदाज का आहे, याचा खुलासाही कपिल यांनी केला आहे.

सामना जिंकण्यासाठी अष्टपैलू खेळाडू असणे आवश्यक : कपिल

विश्वचषक चॅम्पियन कपिल देव लखनऊमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले, 'तुम्हाला तुमच्या संघात अष्टपैलू खेळाडूंशिवाय दुसरे काय हवे आहे, जे तुम्हाला केवळ विश्वचषकातच नव्हे तर इतर स्पर्धा किंवा मालिकेतही सामने जिंकून देतात. हार्दिक पांड्यासारखा क्रिकेटपटू भारतासाठी खूप उपयुक्त ठरेल.

कपिल देव म्हणाले, 'अष्टपैलू हे कोणत्याही संघाचे प्रमुख खेळाडू असतात. ते संघाचे बलस्थान आहेत. हार्दिकसारखा अष्टपैलू खेळाडू सहावा गोलंदाज म्हणून रोहित शर्मा वापरू शकतो. तो एक चांगला फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक देखील आहे. रवींद्र जडेजा देखील टीम इंडियाचा एक परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहे.

भारताने प्रथम टॉप-4 मध्ये पोहचावं

आधी भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठू द्यावी, त्यानंतरच ते विजेतेपद मिळवू शकतील की नाही याबद्दल बोलले पाहिजे, असे ते म्हणाले. कपिल देव म्हणाले, 'आमच्या काळातही टीम इंडियामध्ये अनेक अष्टपैलू खेळाडू होते. T20 क्रिकेटमध्ये, एक संघ सामना जिंकला तर दुसरा हरू शकतो. अशा परिस्थितीत भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याच्या शक्यतांबद्दल बोलण्यात अर्थ नाही. कपिल देव म्हणाले, 'भारतीय संघ टॉप-4 मध्ये स्थान मिळवू शकेल की नाही हा मुद्दा असू शकतो? मला भारतीय संघ टॉप-4 मध्ये पोहोचण्याची चिंता आहे. तरच आपण उपांत्य फेरी गाठू शकू. माझ्या मते, भारतीय संघ टॉप-4 मध्ये पोहोचण्याची शक्यता फक्त 30% आहे.

भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे

16 ऑक्‍टोबरपासून ऑस्ट्रेलियाच्‍या यजमानपदी टी-20 विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सध्या पात्रता सामने (पहिली फेरी) खेळवली जात आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला सुपर-12 च्या गट-ब मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात टीम इंडियाशिवाय पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका देखील आहेत. तर पात्रता फेरीनंतर दोन संघ या गटात प्रवेश करतील. पात्रता फेरीतील गट-2 मधील विजेता आणि गट-1 मधील उपविजेत्या संघाला या गट-ब मध्ये स्थान मिळेल.

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in