गोलंदाजीच्या तालावर नाचवणारी झुलन गोस्वामी होणार निवृत्त; लॉर्ड्सवरती खेळणार शेवटचा सामना
भारतीय महिला क्रिकेट संघाला पुढील मर्यादित षटकांची मालिका इंग्लंडविरुद्ध खेळायची आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी T20 आणि ODI संघांची घोषणा केली आहे. या मालिकेनंतर भारताच्या एका स्टार खेळाडूने निवृत्ती घेण्याचे ठरवले आहे. ही स्टार आहे वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी. भारतीय महिला संघाला इंग्लंड दौऱ्यावर तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. […]
ADVERTISEMENT

भारतीय महिला क्रिकेट संघाला पुढील मर्यादित षटकांची मालिका इंग्लंडविरुद्ध खेळायची आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी T20 आणि ODI संघांची घोषणा केली आहे. या मालिकेनंतर भारताच्या एका स्टार खेळाडूने निवृत्ती घेण्याचे ठरवले आहे.
ही स्टार आहे वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी. भारतीय महिला संघाला इंग्लंड दौऱ्यावर तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या दौऱ्याची सुरुवात 10 सप्टेंबरला पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे. तर शेवटचा एकदिवसीय सामना 24 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना झुलनच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे.
इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात हा दावा केला आहे. झुलनची निवड ही केवळ एकदिवसीय मालिकेसाठीच झाली आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, इंग्लंडविरुद्धची तिसरी वनडे म्हणजेच मालिकेतील शेवटची वनडे झुलनचा निरोप घेणारा सामना असणार आहे. हा सामना लॉर्ड्सवर होणार आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाली नाही
अलीकडेच भारतीय महिला संघाने बर्मिंघम, इंग्लंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. यासह संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. झुलन गोस्वामीला राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. पण आता तिची इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीच निवड झाली आहे.