IPL 2021 : नवीन हंगामाला उरले अवघे काही दिवस, जाणून घ्या काय आहेत प्रत्येक संघासमोरची आव्हानं?
१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित हंगामाला युएईत सुरुवात होणार आहे. पहिला हंगाम कोरोनामुळे स्थगित करावा लागल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित हंगामाचं आयोजन युएईत केलं आहे. या स्पर्धेनंतर युएईतच टी-२० विश्वचषकाचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे आयपीएलचा उर्वरित हंगाम हा प्रत्येक संघासाठी महत्वाचा आहे. कोरोनाचं सावट असल्यामुळे संघांसाठीही आयपीएलचा हा उर्वरित हंगाम सोपा नसेल. या हंगामाचं विजेतेपद मिळवण्यासाठी सर्वांना […]
ADVERTISEMENT

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित हंगामाला युएईत सुरुवात होणार आहे. पहिला हंगाम कोरोनामुळे स्थगित करावा लागल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित हंगामाचं आयोजन युएईत केलं आहे. या स्पर्धेनंतर युएईतच टी-२० विश्वचषकाचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे आयपीएलचा उर्वरित हंगाम हा प्रत्येक संघासाठी महत्वाचा आहे.
कोरोनाचं सावट असल्यामुळे संघांसाठीही आयपीएलचा हा उर्वरित हंगाम सोपा नसेल. या हंगामाचं विजेतेपद मिळवण्यासाठी सर्वांना नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला काही महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्यावं लागणार आहे. थोडक्यात जाणून घेऊयात काय आहेत ही आव्हानं?
१) मुंबई इंडियन्स – (बुमराहचा वर्कलोड फॅक्टर)
जसप्रीत बुमराह हा जसा भारतीय संघासाठी महत्वाचा बॉलर आहे तसाच तो मुंबई इंडियन्ससाठीही महत्वाचा आहे. नुकतंच इंग्लंड दौऱ्यात बुमराहने आश्वासक गोलंदाजी केली. परंतू यानंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठीही बुमराह भारतासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे बुमराहला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही आणि त्याच्यावर ताण येणार नाही याची काळजी मुंबई इंडियन्सला घ्यावी लागणार आहे.