IPL 2021 : आश्वासक सुरुवातीनंतरही RCB गाडी रुळावरुन घसरली, CSK ६ विकेटने विजयी
मुंबई इंडियन्स प्रमाणे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघालाही युएईत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. शारजाहच्या मैदानावर झालेल्या सामन्यात चांगली सुरुवात केल्यानंतरही RCB ची गाडी रुळावरुन घसरली आणि CSK ने ६ विकेट राखून सामन्यात बाजी मारली. या विजयासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आला आहे. पहिल्यांदा बॅटींग करताना RCB ने धडाकेबाज सुरुवात केली. […]
ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्स प्रमाणे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघालाही युएईत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. शारजाहच्या मैदानावर झालेल्या सामन्यात चांगली सुरुवात केल्यानंतरही RCB ची गाडी रुळावरुन घसरली आणि CSK ने ६ विकेट राखून सामन्यात बाजी मारली. या विजयासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आला आहे.
पहिल्यांदा बॅटींग करताना RCB ने धडाकेबाज सुरुवात केली. विराट कोहली आणि देवदत पडीक्कल यांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी रचली. शारजाहच्या छोट्या मैदानाचा फायदा उचलत दोन्ही फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत पहिल्या १० ओव्हरपर्यंत सामन्यावर नियंत्रण मिळवलं. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर ब्राव्होने विराटला आऊट करत RCB ला पहिला धक्का दिला. विराटने ५३ धावा केल्या. यानंतर देवदत पडीक्कलने डिव्हीलियर्सच्या साथीने छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
कसोटी प्रमाणे IPL ही रद्द होतं का ते पाहूया…इंग्लंडच्या माजी खेळाडूचा BCCI ला टोमणा
परंतू शार्दुल ठाकूरने डिव्हीलियर्सला माघारी धाडत RCB ला मोक्याच्या क्षणी धक्का दिला. यानंतर पडीक्कलही शार्दुलच्या जाळ्यात अडकला, त्याने ७० रन्स केल्या. यानंतर RCB चे मधल्या फळीतले फलंदाज मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करु शकले नाहीत. त्यामुळे RCB निर्धारित षटकांत ६ विकेट गमावत १५६ धावांपर्यंत मजल मारु शकली. चेन्नईकडून ब्राव्होने ३, शार्दुल ठाकूरने २, चहरने १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल चेन्नईनेही धडाकेबाज सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि डु-प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलने ही जोडी फोडून RCB ला पहिलं यश मिळवून दिलं. परंतू चेन्नईच्या नंतरच्या फलंदाजांनी छोटेखानी भागीदाऱ्या करणं सुरु ठेवत सामना RCB च्या दिशेने झुकणार नाही याची काळजी घेतली. मोईन अली आणि अंबाती रायुडू माघारी परतल्यानंतर रैना आणि धोनी जोडीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.