IPL 2021 : सलामीचा सामना गमावल्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या आशा कायम, कायरन पोलार्ड म्हणतो…
आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील युएईत खेळवण्यात येणाऱ्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपरकिंग्जने मुंबईवर २० रन्सनी मात करत गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं. ८ सामन्यांत ४ विजय आणि ४ पराभवांमुळे मुंबईचं स्थान थोडसं डळमळीत झालेलं असलं तरीही संघाने अजून आशा सोडलेली नाही. पहिल्या सामन्यात रोहितच्या ऐवजी संघाचं नेतृत्व करणाऱ्या कायरन पोलार्डने आमच्याकडे आणखी […]
ADVERTISEMENT

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील युएईत खेळवण्यात येणाऱ्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपरकिंग्जने मुंबईवर २० रन्सनी मात करत गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं. ८ सामन्यांत ४ विजय आणि ४ पराभवांमुळे मुंबईचं स्थान थोडसं डळमळीत झालेलं असलं तरीही संघाने अजून आशा सोडलेली नाही.
पहिल्या सामन्यात रोहितच्या ऐवजी संघाचं नेतृत्व करणाऱ्या कायरन पोलार्डने आमच्याकडे आणखी ६ सामने शिल्लक आहेत असं म्हणत चांगली कामगिरी करुन दाखवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत ८ गुणांसह चौथ्या स्थानावर असून त्यांना प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उर्वरित ६ पैकी किमान ४ सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे.
IPL 2021 : CSK च्या विजयात पुण्याचा ऋतुराज गायकवाड चमकला, MI वर २० धावांनी मात
“आम्हाला एका अशा खेळाडूची गरज आहे जो अखेरपर्यंत चांगली फलंदाजी करु शकतो. पहिल्या सामन्यात आम्ही काही विकेट अगदी स्वस्तात गमावल्या. या पातळीवर आम्ही असा खेळ करु शकत नाही. पण आमचे सहा सामने अजुनही बाकी आहेत”, सामना संपल्यानंतर पोलार्डने प्रतिक्रिया दिली. अखेरच्या ५ ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नईला खूप जास्त धावा बहाल केल्या. अखेरच्या ५ ओव्हरमध्ये मुंबईने ६९ रन्स काढल्या.