IPL 2021 : इशान किशन-सूर्यकुमारची फटकेबाजी, प्ले-ऑफसाठी मुंबईला करावी लागेल ही कामगिरी

मुंबईची अखेरच्या सामन्याकत २३५ धावांपर्यंत मजल
IPL 2021 : इशान किशन-सूर्यकुमारची फटकेबाजी, प्ले-ऑफसाठी मुंबईला करावी लागेल ही कामगिरी
फोटो सौजन्य - IPL

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी मुंबई इंडियन्सने हैदराबादविरुद्ध सामन्यात २३५ धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने हैदराबादविरुद्ध धावांचा मोठा डोंगर उभा केला.

परंतू प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सला आता हैदराबादला ६५ धावांच्या आत गुंडाळावं लागणार आहे.

इशान किशनने ८४ तर सूर्यकुमार यादवने ८२ धावांची इनिंग खेळत मुंबईला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला हैदराबादला १७१ धावांच्या फरकाने हरवायचं आहे. ही किमया साध्य झाली तरच मुंबई प्ले-ऑफमध्ये दाखल होईल.

आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी आज चांगली कामगिरी केली, परंतू मधल्या फळीत पोलार्ड, निशम, कृणाल पांड्या हे फटकेबाजी करुन धावा जमवण्यात अपयशी ठरले. हैदराबादकडून जेसन होल्डरने ४, राशिद खान-अभिषेक शर्माने प्रत्येकी २-२ तर उमरान मलिकने १ विकेट घेतली.

IPL 2021 : इशान किशन-सूर्यकुमारची फटकेबाजी, प्ले-ऑफसाठी मुंबईला करावी लागेल ही कामगिरी
IPL 2021 : अबुधाबीत इशान किशनचं वादळ, महत्वाच्या सामन्यात विक्रमी इनिंग

Related Stories

No stories found.