IPL 2021 : प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याची मुंबई इंडियन्सला किती संधी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सलग तीन पराभवांचा सामना करावा लागल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघावर ६ विकेट राखून मात केली. लागोपाठ तीन पराभवांमुळे मुंबईचा संघ चौथ्या स्थानावरुन सातव्या स्थानावर घसरला होता. परंतू पंजाबच्या संघावर मिळवलेल्या विजयानंतर मुंबईचा संघ पुन्हा एकदा पाचव्या स्थानावर आला आहे.

पंजाबच्या संघावर मिळवलेल्या विजयानंतर मुंबईचं या स्पर्धेतलं आव्हान कायम राहिलेलं असून प्ले-ऑफची फेरी गाठण्यासाठी त्यांना यापुढील सामन्यांमध्ये कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.

जाणून घेऊयात काय असेल मुंबई इंडियन्ससाठी प्ले-ऑफ मध्ये पात्रतेचा निकष?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंजाबवर मिळवलेल्या विजयानंतर मुंबईने पॉईंट्स टेबलमध्ये उडी मारत पुन्हा एकदा पाचवं स्थान पटकावलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे ११ सामन्यांत ५ विजयांसह १० गुण झाले आहेत. परंतू रनरेट चांगला असल्यामुळे कोलकात्याने चौथं स्थान मिळवलं आहे. यानंतर हे दोन्ही संघ आता पुन्हा समोरासमोर येणार नाहीयेत.

त्यामुळे दोन्ही संघांनी आपले उर्वरित सामने जिंकले तर मुंबई आणि कोलकात्यामध्ये नेट रनरेटच्या आधारावर स्पर्धा होईल. मुंबईने आपल्या नेट रनरेटमध्ये – ०.५५१ वरुन सुधारणा करत – ०.४५३ अशी सुधारणा केली आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा रनरेटही मुंबईपेक्षा काही अंशांनीच सरस आहे, तो म्हणजे + ०.३६३. त्यामुळे पंजाबवरील सामन्यांत विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास कमावलेल्या मुंबईला तिन्ही सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने सफाईदार विजय मिळवणं गरजेचं आहे. याचसोबत मुंबईला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ जर उर्वरित सामन्यांत हरला तरीही फायदा होणार आहे.

ADVERTISEMENT

IPL 2021 : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने चाखली विजयाची चव, पंजाबचा ६ विकेटने पराभव

ADVERTISEMENT

दरम्यान पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. युवा स्पिनर रवी बिश्नोईने मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवला एकाच ओव्हरमध्ये माघारी धाडलं. यानंतर सौरभ तिवारीने क्विंटन डी-कॉकच्या साथीने संघाचा डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी सामना पंजाबच्या पारडण्यात जाणार नाही याची काळजी घेतली. महत्वाच्या क्षणांवर धावा जमवत त्यांनी स्कोअरबोर्डही हलता ठेवला. मोहम्मद शमीने क्विंटन डी-कॉकला आऊट करत मुंबईला तिसरा धक्का दिला.

IPL 2021 : 10 हजार रन्स, 300 विकेट, पोलार्डचा टी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम

यानंतर सौरभ तिवारीही नॅथन एलिसच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी संघाची बाजू सांभाळत फटकेबाजी करत मुंबईला विजय मिळवून दिला.

IPL 2021 च्या वेळापत्रकात महत्वाचा बदल, ‘या’ दिवशी दोन नव्या संघांची नावं होणार घोषित

    follow whatsapp

    ADVERTISEMENT