KKR vs RR: चहलने तर कमाल केली राव… एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट ते देखील हॅटट्रिकसह!
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू हंगामात कालच्या (18 एप्रिल) सामन्यात पहिली हॅटट्रिक पाहायला मिळाली आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) ही कामगिरी केली. चहलने यावेळी एक नवा विक्रम रचला आहे. कारण त्याने हॅटट्रिकसह एकाच ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या याच जबरदस्त कामगिरीमुळे राजस्थान रॉयलने गमावलेला सामन्यात शानदार विजय […]
ADVERTISEMENT

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू हंगामात कालच्या (18 एप्रिल) सामन्यात पहिली हॅटट्रिक पाहायला मिळाली आहे. राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) ही कामगिरी केली. चहलने यावेळी एक नवा विक्रम रचला आहे. कारण त्याने हॅटट्रिकसह एकाच ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या याच जबरदस्त कामगिरीमुळे राजस्थान रॉयलने गमावलेला सामन्यात शानदार विजय मिळवला.
युजवेंद्र चहलने डावाच्या 17 व्या षटकात श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना लागोपाठ चेंडूवर बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली. आयपीएलच्या इतिहासातील ही 21 वी हॅटट्रिक ठरली आहे.
चहलने त्या ओव्हरमध्ये एकूण चार खेळाडू बाद केले. चहलच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या इराद्याने व्यंकटेश अय्यर पुढे सरसावला पण संजू सॅमसंगने आरामात त्याला स्टम्पिंग केलं. त्यानंतर चौथ्या चेंडूवर चहलने श्रेयस अय्यरला एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्याच्या पाठोपाठ त्याने पुढच्याच चेंडूवर शिवम मावीला रियान परागकरवी झेलबाद केलं. तर पॅट कमिन्सला यष्टिरक्षक संजू सॅमसनने झेलबाद करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली.
The first hat-trick and a fifer of IPL 2022. What a spell by Yuzvendra Chahal. #RRvKKR #yuzichahalpic.twitter.com/XQtS0iHK6c
— Bunny? Gamccha !! (@itzDeviL07) April 18, 2022
राजस्थानकडून पाचवी हॅटट्रिक