IPL 2023 Final CSK vs GT : आजही सामना झाला नाही, विजेता कोण? जाणून घ्या समीकरण - Mumbai Tak - ipl 2023 final csk vs gt who will be winner if match draw - MumbaiTAK
बातम्या स्पोर्ट्स

IPL 2023 Final CSK vs GT : आजही सामना झाला नाही, विजेता कोण? जाणून घ्या समीकरण

IPL 2023 च्या अंतिम सामन्यात (IPL 2023 Final CSK vs GT) जर राखीव दिवशी म्हणजे 29 मे रोजी पाऊस पडला तर चेन्नई आणि गुजरातमध्ये ट्रॉफी कोणत्या संघाला मिळेल?
In the final of IPL 2023 (IPL 2023 Final CSK vs GT), if it rains on the reserve day May 29 also, then who will get the trophy in Chennai and Gujarat?

आयपीएल 2023 ची फायनल (IPL 2023 Final, CSK vs GT) 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नियोजित वेळापत्रकानुसार खेळवली जाणार होती. मात्र पावसामुळे 28 मे रोजी सामना झालाच नाही आणि हा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तरीही सामन्यावरील पावसाचे सावट कायम आहे. 29 मे रोजी म्हणजेच राखीव दिवशीही पाऊस होण्याची शक्यता आहे. राखीव दिवशीही सामना झाला नाही, तर चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघापैकी कुणाला विजेता म्हणून घोषित केले जाईल. त्याबद्दलचा नियमही समोर आला आहे.

29 मे रोजी हवामान कसे असेल?

प्रथम हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 29 मे रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता 21 टक्के आहे. यादरम्यान, जेव्हा सामना होईल तेव्हा काळे ढग दाटून राहतील. दुपारनंतर अहमदाबादमध्ये आकाशात ढगांची गर्दी वाढेल. आता विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे 28 मे रोजी फायनलच्या दिवशी हवामान स्वच्छ घोषित केले होते. मात्र असे असतानाही अचानक वातावरण बिघडले आणि अंतिम सामना होऊ शकला नाही.

हेही वाचा >> IPLच्या विजेत्या, उपविजेत्या संघावर बक्षिसांची लयलूट! किती Prize Money मिळणार?

राखीव दिवशी काय होईल?

28 मे प्रमाणेच राखीव दिवशीही पावसामुळे 120 मिनिटे जादा वेळ घेण्यात येणार आहे. तीन तास 20 मिनिटांव्यतिरिक्त राखीव दिवशी दोन तासांचा अतिरिक्त वेळ घेण्यात आला आहे. जेणेकरून सामना कोणत्याही परिस्थितीत होऊ शकेल.

षटके कशी आणि कधी कमी होतील?

समजा राखीव दिवशीही पाऊस पडला. त्यामुळे 5-5 षटकांचा सामनाही होऊ शकत नाही. त्यानंतर शेवटची स्थिती म्हणजेच एक षटकांच्या सामन्यासाठी शेवटची वेळ मर्यादा 1:20 ठेवण्यात आली आहे. या वेळेपर्यंत मैदान तयार झाल्यास सुपर ओव्हरने सामन्याचा निर्णय होईल. 5-5 षटकांची अंतिम वेळ मर्यादा 12.6 मिनिटे आहे. 20-20 षटकांच्या सामन्यासाठी शेवटची वेळ मर्यादा 9:36 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

हेही वाचा >> Mangesh Chavan : “एकनाथ खडसे म्हणजे विकृती, राष्ट्रवादी काँग्रेससाठी पनवती”

अंतिम सामना रद्द झाल्यास काय?

अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसानंतर राखीव दिवशीही पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. या प्रकरणात, स्पर्धेच्या साखळी टप्प्यातील 70 सामन्यांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जाईल. त्यामुळे गुजरातचा संघ चॅम्पियन होऊ शकतो. कारण त्याने साखळी टप्प्यातील 14 पैकी 10 सामने जिंकले. तर चेन्नई संघाने 8 सामने जिंकले होते.

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…