MS Dhoni: टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीविरोधात खटला दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बेगुसराय (बिहार): भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह आठ जणांवर बिहारमधील बेगुसराय येथील मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. डीएस एंटरप्रायझेसचे मालक नीरज कुमार निराला यांनी हा खटला दाखल केला आहे. या आठही जणांनी 2021 मध्ये न्यू ग्लोबल अपग्रेड इंडिया लिमिटेडचे ​​सीएनएफ घेतल्याचा आरोप तक्रारदार नीरज कुमार यांनी केला आहे.

सीएनएफ घेण्यासाठी नीरज कुमारने कंपनीला 36 लाख 86 हजार रुपये दिले. त्यानंतर कंपनीने त्याला खतं पाठवली. मात्र, अनेक प्रयत्न करूनही खतांची विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे तक्रारदार व कंपनीत वाद होऊन कंपनीने 30 लाखांचा धनादेश देऊन सर्व खतं परत घेतली.

चेक बाऊन्स झाला

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कंपनीने खतं परत घेऊन 30 लाखांचा धनादेश दिला जो बाऊन्स झाला. चेक बाऊन्स झाल्यानंतर कंपनीच्या लोकांशी अनेकदा बोलूनही प्रश्न सुटला नाही, त्यानंतर महेंद्रसिंग धोनीसह आठ जणांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

तक्रारदार नीरज यांच्या वतीने वकील कुमार संजय हे खटल्याचे काम पाहत आहेत. तक्रारदाराने त्याच्या तक्रार पत्रासोबत महेंद्रसिंग धोनीने केलेली जाहिरात, त्याचे फोटो आणि कायदेशीर नोटीस या सगळ्या गोष्टी कोर्टापुढे ठेवल्या आहेत.

ADVERTISEMENT

IPL 2022, CSK: …तर जग संपणार नाहीये, महेंद्रसिंह धोनी असं का म्हणाला?

ADVERTISEMENT

28 जून रोजी या प्रकरणाची होणार सुनावणी

न्यू ग्लोबल उपज बर्धक इंडिया लिमिटेड, नवी दिल्लीचे मार्केटिंग स्टेट हेड बिहार अजय कुमार, सीईओ राजेश आर्य, कंपनीचे चेअरमन महेंद्रसिंग धोनी आणि 8 जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 120B आणि NI कायद्याच्या कलम 138 अंतर्गत न्यायालयात हे तक्रार पत्र देण्यात आले आहे.

या प्रकरणावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने ते पुढील सुनावणीसाठी न्यायदंडाधिकारी अजय कुमार मिश्रा यांच्याकडे पाठवले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 जून रोजी होणार आहे.

त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आता या प्रकरणात महेंद्रसिंग धोनीवर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT