Rohit pawar : शरद पवारांचे दोन नातू आले समोरासमोर, एकाने मारलं मैदान
MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (maharashtra cricket association) राजकारणापासून दूर राहिलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्तक्षेपानंतरही पवारांच्या दोन नातवांमध्ये (sharad pawar grandson) निवडणूक रंगली. अर्थात यात बाजी मारली ती पवारांच्या एका नातवानेच. शरद पवारांचे 2 नातू रोहित पवार (Rohit Pawar) आणि अभिषेक बोके (Abhishek Boke) हे MCA च्या निवडणुकीच्या (maharashtra cricket association election 2023) […]
ADVERTISEMENT

MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (maharashtra cricket association) राजकारणापासून दूर राहिलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्तक्षेपानंतरही पवारांच्या दोन नातवांमध्ये (sharad pawar grandson) निवडणूक रंगली. अर्थात यात बाजी मारली ती पवारांच्या एका नातवानेच. शरद पवारांचे 2 नातू रोहित पवार (Rohit Pawar) आणि अभिषेक बोके (Abhishek Boke) हे MCA च्या निवडणुकीच्या (maharashtra cricket association election 2023) रिंगणात आमनेसामने आले.
MCA च्या संलग्न क्लबमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले रोहित पवार हे शरद पवारांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू लागतात. तर, अभिषेक बोके हे पवारांच्या भगिनीचे नातू आहेत.
रविवारी गहुंजे इथे झालेल्या MCA च्या निवडणुकीत शरद पवारांचे दोन नातू निवडणुकीच्या मैदानात आमनेसमाने आले. या निवडणुकीत माजी क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर आणि सुनील संपतलाल मुथा यांनी अर्ज दाखल केले होते.
‘आजोबांनी चीअरलीडर्स आणल्या, हे महाशय..’, राणेंची शरद पवारांवर टीका