T-20 World Cup : एकही पैसा न घेता धोनी भारतीय संघाला करणार मार्गदर्शन – जय शहांचं स्पष्टीकरण

मुंबई तक

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नईचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. या धडाकेबाज कामगिरीनंतरही धोनी युएईत थांबणार असून तो आगामी टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून काम पाहणार आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करताना बीसीसीआयने याबद्दलची घोषणा केली होती. परंतू या कामासाठी धोनी एक नवीन पैसा स्विकारणार नसल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नईचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. या धडाकेबाज कामगिरीनंतरही धोनी युएईत थांबणार असून तो आगामी टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून काम पाहणार आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करताना बीसीसीआयने याबद्दलची घोषणा केली होती.

परंतू या कामासाठी धोनी एक नवीन पैसा स्विकारणार नसल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितलं. ते ANI वृत्तसंस्थेशी बोलत होते.

टी-२० विश्वचषकात धोनीची मेंटॉर म्हणून नेमणूक करण्याची कल्पना जय शहा यांना सुचली. यासाठी गेले काही महिने ते धोनीसोबत चर्चा करत होते. फक्त टी-२० विश्वचषकापुरताच धोनी भारतीय संघासोबत मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहे.

T-20 World Cup मध्ये यंदा पहिल्यांदाच DRS चा वापर, ICC चा महत्वपूर्ण निर्णय

यंदाचा टी-२० विश्वचषक हा भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. या स्पर्धेनंतर विराट कोहलीने आपल्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत विराट कोहली भारताला एकही महत्वाची आयसीसी स्पर्धा जिंकवून देऊ शकलेला नाहीये. त्यामुळे धोनीच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीची टीम इंडिया टी-२० वर्ल्डकप कसा जिंकेल यासाठी बीसीसीआय प्रयत्नात आहे. धोनीचा अनुभव संघाच्या कामाला येऊ शकतो असं म्हणत त्याची मेंटॉरच्या जागेवर नेमणूक झाल्याचं जय शहा यांनी स्पष्ट केलं आहे.

IPL BLOG: देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी!

हे वाचलं का?

    follow whatsapp