नवीन पटनाईकांचा गोल ! पुढील १० वर्षांसाठी Hockey India ला स्पॉन्सरशीप देण्याचा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय हॉकी संघाने नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहासाची नोंद करत पदकाची कमाई केली. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं. कांस्यपदकाच्या शर्यतीत भारताने जर्मनीवर ५-४ ने मात केली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर सर्व स्तरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. परंतू भारतीय संघाच्या या यशात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ओडीशा सरकारनेही एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ओडीशा सरकार पुढील १० वर्षांसाठी भारतीय हॉकी संघाला स्पॉन्सरशीप देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सहारा समुहाचा भारतीय हॉकी संघासोबतचा करार संपल्यानंतर हॉकीला स्पॉन्सरशीप मिळवताना प्रॉब्लेम येत होता. अशावेळी नवीन पटनाईक यांच्या ओडीशा सरकारने २०२३ पर्यंत भारतीय हॉकी संघाच्या स्पॉन्सरशीपची जबाबदारी घेतली. परंतू टोकियोत भारतीय हॉकी संघाने केलेल्या कामगिरीनंतर आता ओडीशा सरकारने ही स्पॉन्सरशीप पुढील १० वर्षांसाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ओडीशा आणि हॉकी हे आता एक समीकरणच बनलेलं आहे. आम्ही हॉकी इंडियासोबतचं आमचं नात असंच पुढे सुरु ठेवणार आहोत. ओडीशा सरकार भारतीय हॉकी संघाला पुढची १० वर्ष अशाच पद्धतीने मदत करणार आहे. भारतीय हॉकीसाठी हे नवीन युग असून या माध्यमातून आपण आपले जुने दिवस पुन्हा आणू शकू अशी मला अशा आहे.

नवीन पटनाईक – ओडीशाचे मुख्यमंत्री

कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलत असताना पटनाईक यांनी ही घोषणा केली. २०१८ साली ओडीशा सरकारने हॉकी इंडियासोबत ५ वर्षांसाठी करार करत १४० कोटी रुपये स्पॉन्सरशीप म्हणून दिले होते. इतकच नव्हे तर याव्यतिरीक्त ओडीशा राज्यात हॉकीपटूंसाठी सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि सरावासाठी मैदानं तयार करण्यातही ओडीशा सरकारने मोलाची भूमिका बजावली आहे.

ADVERTISEMENT

BLOG : ४१ वर्षांच्या राखेतून भारतीय हॉकीची Olympics मध्ये ‘फिनीक्स’भरारी

ADVERTISEMENT

follow whatsapp

ADVERTISEMENT