Tokyo Olympics 2020: ‘तुम्ही जबरदस्त काम केलंय, संपूर्ण देश नाचतोय’, PM Modi यांचा थेट भारतीय हॉकी टीमला फोन!
नवी दिल्ली: भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवून तब्बल 41 वर्षानंतर पदकाची कमाई केली आहे. हॉकीत मिळालेलं हे यश नक्कीच अभूतपूर्व असं आहे. सुमारे 41 वर्ष भारत ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत होता. अखेर टोकियोत त्यांना हे यश मिळालंच. त्यांचं हे यश आज अवघा देश साजरं करत आहे. अशावेळी देशाचे पंतप्रधान […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवून तब्बल 41 वर्षानंतर पदकाची कमाई केली आहे. हॉकीत मिळालेलं हे यश नक्कीच अभूतपूर्व असं आहे. सुमारे 41 वर्ष भारत ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत होता. अखेर टोकियोत त्यांना हे यश मिळालंच. त्यांचं हे यश आज अवघा देश साजरं करत आहे. अशावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयी संघाला स्वत: फोन करुन त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांचं प्रचंड कौतुक केलं.
कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय संघाने जो चित्तथरारक विजय मिळवला त्यामुळे देशात एकच जल्लोष साजरा केला जात आहे. हाच जल्लोष भारतीय संघापर्यंत पोहचवावा आणि खेळाडूंचं कौतुक करावं या हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचा कॅप्टन मनप्रीत सिंग, मुख्य कोच ग्राहम रिड आणि सहाय्यक कोच पियुष दुबे यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. ज्याचा व्हीडिओच आता समोर आला आहे.
पाहा पंतप्रधान मोदी फोनवरुन नेमकं काय म्हणाले:
‘तुम्ही जबरदस्त काम केलंय, संपूर्ण देश नाचतो आहे. तुमच्या लोकांची मेहनत कामी आली आहे. पियुषजींनी देखील खूप मेहनत केली. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य आहे. आपण 15 ऑगस्टला भेटणार आहोत मी तुम्हा सर्वांना बोलावलं आहे. पियुषजी आहेत का तिथे?’










