Asia Cup: सर जडेजाने रचला इतिहास! इरफान पठाणलाही टाकलं मागे
टीम इंडिया आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. श्रीलंकेचा पराभव करून संघाने ही कामगिरी केली. तर रवींद्र जडेजाने भारतासाठी इतिहास रचला.
ADVERTISEMENT

Ravindra Jadeja, Asia Cup 2023: आशिया कप 2023 च्या सुपर 4 सामन्यात भारताने गतविजेत्या श्रीलंकेचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात नवा इतिहास रचणारा खेळाडू म्हणजे रवींद्र जडेजा. रवींद्र जडेजाने 10 षटकांत 33 धावा देत 2 बळी घेतले. मात्र या 2 विकेट्समुळे त्याने नवा इतिहास रचला आहे. जडेजा आता आशिया कपमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणला मागे टाकत त्याने हे स्थान मिळवले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी जडेजाच्या 22 विकेट होत्या आणि तो पठाणच्या बरोबरीत होता. पण आता त्याच्या नावावर 24 विकेट्स आहेत.
आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
रवींद्र जडेजा – 24
इरफान पठाण – 22
कुलदीप यादव – 19
सचिन तेंडुलकर- 17
कुलदीप यादव – 15










