Rohit Sharma : ‘खरं सांगायचं तर…’, रोहितने सांगितल्या चुका, कुणाला ठरवलं जबाबदार?
Rohit Sharma Reaction On Ind vs Aus Final Result : ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकली. भारताचा पराभव का झाला, याबद्दल रोहित शर्माने मोकळेपणाने भाष्य केले.
ADVERTISEMENT

Australia Beat India by 6 Wickets : मायदेशात होत असलेल्या विश्वचषकावर टीम इंडिया नाव कोरणार, हे स्वप्न रविवारी (19 नोव्हेंबर) भंगले. पराभवानंतर टीम इंडियाचे अनेक खेळाडू उदास दिसत होते, मैदान सोडताना रोहित शर्मा भावूक झाला होता. विराटलाही पराभवाचे दु:ख लपवता आले नाही आणि जसप्रीत बुमराहने मोहम्मद सिराजला सांभाळण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या झालेल्या पराभवाबद्दल कर्णधार रोहित शर्माने झालेल्या चुका सांगितल्या. टीम इंडिया कुठे आणि कशी चुकली, याबद्दल रोहित स्पष्टपणे बोलला. (After the match, Rohit Sharma told where Team India had gone wrong.)
रोहित आणि टीम इंडियाचे खेळाडू तसेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावल्यामुळेची निराशा स्पष्ट दिसत होती. सामना संपल्यानंतर रोहितने टीम इंडियाची कुठे चूक झाली हे सांगितले. सामन्यानंतर रोहित म्हणाला, “मॅचचा निकाल आमच्या बाजूने लागला नसला, तरी आम्हाला माहित आहे की आजचा दिवस आमच्यासाठी चांगला नव्हता, पण मला संघाचा अभिमान आहे.”
Well played india 🇮🇳
We’re proud of you
and we stand by you
Team India
No matter what the result is#ICCCricketWorldCup2023Final @BCCI pic.twitter.com/mgyjVusRja— Razaullah Chaudhary (@RazaullahC48045) November 19, 2023
फायनलमध्ये पराभव, रोहित शर्मा म्हणाला…
अहमदाबादमध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला भारतीय संघ 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या आव्हानाचा बचाव करणे गोलंदाजांसाठी कठीण होते. रोहित शर्मा म्हणाला, “पण खरे सांगायचे तर स्कोअरमध्ये 20-30 धावांची भर पडली असती, तर बरे झाले असते. जेव्हा केएल राहुल आणि विराट कोहली फलंदाजी करत होते, तेव्हा आम्ही 270-280 धावांपर्यंत पोहोचू असे वाटत होते, पण आम्ही ठराविक काळाने विकेट गमावल्या.”