किंग कोहलीचा तेंडुलकरला धोबीपछाड, Ind vs Aus सामन्यात झाले 11 ऐतिहासिक विक्रम

भागवत हिरेकर

भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात ११ ऐतिहासिक विक्रम झाले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहलीने आता सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.

ADVERTISEMENT

Ind vs Aus Match : Kohli has made two big records on the basis of this innings. He has also defeated legends like Sachin Tendulkar and Ricky Ponting.
Ind vs Aus Match : Kohli has made two big records on the basis of this innings. He has also defeated legends like Sachin Tendulkar and Ricky Ponting.
social share
google news

India vs Australia World Cup 2023 Match: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात आश्चर्यकारक विक्रमांची नोंद झाली. विराट कोहलीने 116 चेंडूत 85 धावा करत कांगारूंचा पराभव करण्यात सिंहाचा वाटा उचलला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना खूपच रंगतदार झाला. यात तब्बल 11 ऐतिहासिक विक्रम केले आहेत.

विराट कोहलीने या खेळीच्या जोरावर दोन मोठे विक्रम केले आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे त्याने सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही एकदिवसीय विश्वचषकात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. या सामन्यात 11 ऐतिहासिक रेकॉर्ड बनले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…

भारतात ऑस्ट्रेलियन संघाचे दोन मोठे विक्रम

पहिला विक्रम असा की, ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत भारतीय भूमीवर विश्वचषकात 19 सामने खेळले आहेत, त्यापैकी केवळ 4 वेळा पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय भूमीवरील हा एक वेगळा विक्रम आहे. दुसरा विक्रम म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ 1987 नंतर प्रथमच चेन्नईच्या मैदानावर विश्वचषकात सामना हरला आहे. आतापर्यंत त्याने या मैदानावर 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत.

पहा VIDEO >> IND vs AUS: चित्यासारखी झेप… विराट कोहलीने घेतला अप्रतिम झेल

कमीत कमी धावांमध्ये 3 गडी गमावून सामना जिंकला

2 धावा – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई, 2023*
4 धावा- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, अॅडलेड, 2004
4 धावा- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, 2009
5 धावा- श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड, ढाका, 1998

हे वाचलं का?

    follow whatsapp