IPLच्या इतिहासात आत्तापर्यन्त 22 गोलंदाजांनी घेतली हॅट्रिक; रोहित शर्मापण यादीत

मुंबई तक

Hattrick in IPL : अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करताना हॅट्रिक घेतली. लेगस्पिनर रशीदने डावाच्या 17व्या षटकात आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि शार्दुल ठाकूर यांना बाद करून ही हॅट्रिक पूर्ण केली. तसे, राशिद खानच्या हॅट्रिकनंतरही गुजरात टायटन्सला सामन्यात तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यामागचे कारण होते रिंकू सिंगने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Hattrick in IPL : अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करताना हॅट्रिक घेतली. लेगस्पिनर रशीदने डावाच्या 17व्या षटकात आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि शार्दुल ठाकूर यांना बाद करून ही हॅट्रिक पूर्ण केली. तसे, राशिद खानच्या हॅट्रिकनंतरही गुजरात टायटन्सला सामन्यात तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यामागचे कारण होते रिंकू सिंगने शेवटच्या पाच चेंडूंवर षटकार ठोकून केकेआरला संस्मरणीय विजय मिळवून दिला. (22 bowlers have taken a hat-trick in IPL history so far; Rohit Sharma is also in the list)

IPL 2023 : ;सिक्सर पंच;ने गुजरातचा धुव्वा; कोण आहे रिंकू सिंग?

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील ही 22वी हॅट्रिक होती. आयपीएलमध्ये आतापर्यंत 19 गोलंदाजांनी हॅट्रिक केली आहे. 40 वर्षीय लेगस्पिनर अमित मिश्रा हा आयपीएलमध्ये तीन हॅट्रिक करणारा एकमेव गोलंदाज आहे. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स (2008), डेक्कन चार्जर्स (2011) आणि सनरायझर्स हैदराबाद (2013) साठी हॅट्रिक घेतली. युवराज सिंगने एकाच मोसमात दोन हॅट्रिकस केल्या होत्या. आयपीएलमध्ये हॅट्रिक करणारा राशिद खान हा तिसरा कर्णधार आहे. याआधी युवराज सिंग आणि शेन वॉटसन यांनाच ही कामगिरी करता आली होती.

IPL: अमित मिश्राच्या तीन हॅट्रिक

1. 2008 – डेक्कन चार्जर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी
2. 2011 – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध डेक्कन चार्जर्ससाठी
3. 2013 – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पुणे वॉरियर्स

हे वाचलं का?

    follow whatsapp