IPL : उत्तम कामगिरीनंतरही टीम ओनर्सनी दाखवला बाहेरचा रस्ता
आयपीएलने फार कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव निर्माण केलं आहे. आयपीएल म्हटलं की पैसा, मनोरंजन आणि रात्रीपर्यंत चालणाऱ्या सामन्यांचा थरार असं चित्र आपल्या डोळ्यासमोर तयार होतं. अनेक खेळाडू या स्पर्धेत चांगली कामगिरी करुन भारतीय संघात आपलं स्थान निश्चीत करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्याच्या भारतीय संघातील अनेक खेळाडू हे आयपीएलमध्ये आश्वासक कामगिरी करुन पुढे आलेले […]
ADVERTISEMENT
आयपीएलने फार कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव निर्माण केलं आहे. आयपीएल म्हटलं की पैसा, मनोरंजन आणि रात्रीपर्यंत चालणाऱ्या सामन्यांचा थरार असं चित्र आपल्या डोळ्यासमोर तयार होतं. अनेक खेळाडू या स्पर्धेत चांगली कामगिरी करुन भारतीय संघात आपलं स्थान निश्चीत करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्याच्या भारतीय संघातील अनेक खेळाडू हे आयपीएलमध्ये आश्वासक कामगिरी करुन पुढे आलेले आहेत.
ADVERTISEMENT
अनेकदा प्लेअर्सना चांगली कामगिरी केल्यानंतरही संघातलं स्थान गमवावं लागलंत. आज आपण अशा ५ खेळाडूंची नावं जाणून घेणार आहोत.
५) युवराज सिंह (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – २०१८)
हे वाचलं का?
२००७ टी-२० आणि २०११ विश्वचषक विजयाचा हिरो अशी ओळख असलेला युवराज सिंह दुर्दैवाने आयपीएलमध्ये कधीच कोणत्याही एका संघात स्थिरावू शकला नाही. ११ वर्षांच्या कारकिर्दीत युवराज किंग्ज इलेव्हन पंजाब, पुणे वॉरियर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनराईजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अशा संघाकडून खेळला आहे. २०१४ साली RCB ने युवराजवर १४ कोटींची बोली लावली होती.
२०१४ मध्ये युवराजने बॅटींगमध्ये आपली चमक दाखवत १४ मॅचमध्ये ३७६ रन्स केल्या. त्या वर्षात युवराज RCB कडून सर्वात जास्त रन्स करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. याव्यतिरीक्त युवराजने ५ विकेट्स घेत आपली चमक दाखवली होती. त्यानंतरही २०१५ च्या सिझनमध्ये RCB ने युवराजला संघात स्थान दिलं नाही.
ADVERTISEMENT
४) सौरव गांगुली – (कोलकाता नाईट रायडर्स – २०१०)
ADVERTISEMENT
कोलकाता नाईट रायडर्सचा विचार करायला गेला तर आयपीएलमध्ये काही वर्षांपूर्वी सौरव गांगुली हा त्यांचा एकमेव चेहरा होता. २०१० मध्ये गांगुलीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत १४ मॅचमध्ये ३७.९२ च्या सरासरीने ४९३ रन्स केल्या. २०१० च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा एकही बॅट्समन ३०० रन्सचा टप्पा पूर्ण करु शकला नव्हता. या सिझनमध्ये सौरव गांगुलीने ४ हाफ सेंच्युरी झळकावल्या. २०११ साली बीसीसीआयने आयपीएलचं मेगा ऑक्शन जाहीर केलं. अनेकांना असं वाटलं होतं की दादा पुन्हा KKR च्या संघात जाईल. परंतू आश्चर्याची गोष्ट म्हणजे KKR ने दादाला आपल्या संघात घेण्यात रस दाखवला नाही. अखेरीस २०११ मध्ये पुणे वॉरियर्स संघाने गांगुलीला रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून करारबद्ध केलं.
३) मायकल हसी – (चेन्नई सुपरकिंग्ज – २०१३)
२०१४ साली चेन्नई सुपरकिंग्जच्या रणनितीने सर्वांनाच धक्का बसला होता. २०१३ चा सिझन चेन्नईकडून खेळत असताना हसीने धावांचा पाऊस पाडला. सहा अर्धशतक झळकावून ७३३ रन्स केलेल्या हसीला आगामी सिझनसाठी चेन्नईने संघात स्थान दिलंच नाही. २०१४ साली झालेल्या ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने हसीवर ५ कोटींची बोली लावली. या सिझनमध्ये हसी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही…मात्र २०१५ मध्ये चेन्नईने हसीला पुन्हा एकदा आपल्या संघात स्थान दिलं. सध्या हसी चेन्नई सुपरकिंग्जचा सहायक प्रशिक्षक म्हणून काम करतो.
२) नितीश राणा – (मुंबई इंडियन्स – २०१७)
२०१७ सालात नितीश राणाने मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून आपल्या आयपीएल इनिंगला सुरुवात केली. या सिझनमध्ये नितीशने १२ सामन्यांमध्ये ३३३ रन्स करुन आपली चमक दाखवली. या सिझनमध्ये रोहित शर्माच्या तुलनेत नितीशची कामगिरी चांगली झाली होती. नितीशने २४ बाऊंड्री आणि १७ सिक्स लगावत आपण फटकेबाजी करण्यासाठी समर्थ असल्याचं दाखवून दिलं होतं. मात्र यानंतरच्या हंगामात नितीश राणाला मुंबईने संघात कायम राखलं नाही. परंतू कोलकाता नाईट रायडर्सनेही ही संधी सोडली नाही आणि नितीश राणाला आपल्या संघात स्थान दिलं. यानंतर आतापर्यंत नितीश KKR चा सदस्य आहे.
१) शॉन मार्श – (किंग्ज इलेव्हन पंजाब – २०१७)
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा अविभाज्य खेळाडू असलेल्या शॉन मार्शने अनेक वर्ष आयपीएल खेळत आहे. यादरम्यान त्याच्या कामगिरीत चढ-उतार पहायला मिळाला. २०१७ च्या सिझनमध्ये मार्शची कामगिरी ही चांगली झाली होती. १३६.८ चा स्ट्राईक रेट आणि ३३ च्या सरासरीने मार्शने २६४ रन्स केल्या. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे यानंतर एकाही संघाने त्याच्यावर बोली लावण्यात स्वारस्य दाखवलं नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT