शिंदेसेनेच्या नेत्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली बंदूक, भंडारा जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार
Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमरस गोबरवाही पोलीस ठाणे परिसरातील येणाऱ्या आष्टी येथे आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातच राष्ट्रवादीचे नेते असलेल्या माजी अपसभापती शिशुपाल गोपाले यांनी शिवसेनेच्या ठाकचंद मुंगूसमारे यांच्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंगूसमारे यांच्या धान गोदामात गोळीबार करण्याचा प्रयत्न
शिशुपाल गोपाले यांच्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद
Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमरस गोबरवाही पोलीस ठाणे परिसरातील येणाऱ्या आष्टी येथे आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातच राष्ट्रवादीचे नेते असलेल्या माजी अपसभापती शिशुपाल गोपाले यांनी शिवसेनेच्या ठाकचंद मुंगूसमारे यांच्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात शिशुपाल गोपाले या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी 1 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास आष्टी गावात घडली आहे. या घटनेनं आता गावकऱ्यांच्यातही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हे ही वाचा : माझ्यावर दबाव टाकण्यासाठी कुटुंबियांविरोधात खटले दाखल केले, माजी सरन्यायाधीशांचे सनसनाटी आरोप
मुंगूसमारे यांच्या धान गोदामात गोळीबार करण्याचा प्रयत्न
शिशुपाल गोपाले यांनी मुंगूसमारे यांच्या धान गोदामात जाऊन हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर शिवीगाळही करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यामुळे ठाकचंद मुंगूसमारे तसेच अजय गहाणे यांनी विचारणा केली असता, ते बाहेर येऊन गोपाले यांनी आपल्या उभ्या असलेल्या बलेनो चारचाकी वाहन (MH 36-AL-2392) बंदूक आणली. त्यानंतर ठाकचंद यांच्यावर रोखून धरत ठार मारेन अशी धमकीही देण्यात आली होती, अशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.
शिशुपाल गोपाले यांच्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद
या प्रकरणी अजय गहाणे यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून शिशुपाल गोपाले यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 325, 351, 329 नुसात तसेच शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्ह्यांची नोंद दाखल करण्यात आली.
हे ही वाचा : गुवाहाटीला गेलेला शिंदेंचा 'हा' आमदार हॉटेलवरुन उडी मारण्याच्या विचारात होता; मंत्री संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट
या एकूण प्रकरणात पोलीस पुढील तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित रोखून धरलेली बंदूक छर्हाची होती त्यामुळे परवानगीची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिशुपाल गोपाले आणि ठाकचंद मुंगूसमारे हे दोघेही धान, रेतीसारख्या उद्योगदंध्यात भागीदार असून राष्ट्रवादीत होते. पण नंतर मुंगूसमारे यांनी राष्ट्रवादीला राम राम करत शिवसेनेत नुकताच प्रवेश केला आणि त्यानंतर हा वाद झाल्याचे दिसून आले.










