Abdul Razzaq Aishwarya Rai: ‘ऐश्वर्यासोबत लग्न करू आणि मुलंही…’, रझाकने काय बरळला?
abdul razzaq controversial remark on aishwarya rai : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल वादग्रस्त विधान केले. यावरून त्याच्यावर टीका झाली, त्यानंतर रझाकने सर्वांची माफी मागितली.
ADVERTISEMENT

Abdul Razzaq controversial remark on Aishwarya Rai : विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतच पाकिस्तानी संघ बाहेर पडला. स्पर्धेतील लाजिरवाण्या कामगिरीमुळे पाकिस्तान संघावर टीका होत आहे. त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरही तोंडसुख घेतलं जात आहे. त्यातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने पीसीबीची खिल्ली उडवताना अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली. त्यानंतर त्याने या विधानाबद्दल माफीही मागितली.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) टीका करत सर्व मर्यादा ओलांडल्या. अब्दुल रझाकने पीसीबीची तुलना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत केली आणि तिच्या चारित्र्याबद्दल वाईट विधान केले.
आफ्रिदी आणि इतर खेळाडू रझाकच्या विधानावर हसत राहिले
एका कार्यक्रमात पीसीबीच्या भूमिकवर बोलताना रझाकने ऐश्वर्या रायबद्दल हीन टीका केली. रझाक म्हणाला की, “जर तुम्हाला वाटत असेल की, मी ऐश्वर्या रायशी लग्न करेन आणि नंतर मला चांगले मुलही होईल, तर असे कधीही होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला आधी तुमचे नियत चांगली ठेवावी लागेल.” रझाकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा >> World Cup 2023 नंतर सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाड होणार कर्णधार?
रझाकने हे विधान केले तेव्हा 2009 टी-20 विश्वचषक विजेता संघातील खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि इतर खेळाडू त्यांच्यासोबत मंचावर उपस्थित होते. हे ऐकून सगळे हसायला लागले. रझाकसोबत हे सर्व खेळाडूही कार्यक्रमात सहभागी झालेले होते.