PCB ला आणखी एक धक्का, न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडच्या संघाचाही पाकिस्तानात येण्यास नकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणखी एक धक्का बसलेला आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडच्या संघाने सुरक्षेचं कारण देऊन पाकिस्तान दौरा रद्द केला होता. सामना सुरु होण्याआधी अर्धा तास बाकी असताना हा दौरा रद्द झाल्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाचं मोठं नुकसान झालं. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही आपला नियोजीत पाकिस्तान दौरा रद्द केला आहे.

ADVERTISEMENT

इंग्लंडचा क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्यात टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानात येणार होता. याचदरम्यान इंग्लंडच्या महिला संघाचेही सामने यावेळी होणार होते. परंतू त्याआधीच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपण दौऱ्यातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

‘खेळाडूंवर तणाव नको, म्हणून दौरा रद्द’ – इंग्लंड क्रिकेट बोर्ड

हे वाचलं का?

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटलं आहे की, “आमच्यासाठी खेळाडूं आणि सपोर्ट स्टाफचं मानसिक आणि शाररिक आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही प्रकारचा प्रवास धोक्याचाच आहे. त्यात त्या भागात दौऱ्यासाठी जाण्याने खेळाडूंवर ताण वाढेल. त्यात कोरोनासंबधी नियम आणि एकंदरीत तणावामुळे आगामी टी-20 विश्वचषकासाठी आमच्या टी-20 संघावरही याचा परिणाम होईल. या सर्व कारणांमुळे आम्ही हा निर्णय़ घेत आहोत.”

भारतीय क्रिकेटपटूंचं होणार Increament, BCCI कडून मॅच फी मध्ये वाढ

ADVERTISEMENT

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीझ राजा यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयावर दुःख व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

पाकिस्तानला मोठा धक्का, ऐन मॅचच्या दिवशी ‘या’ टीमकडून संपूर्ण दौराच रद्द!

लागोपाठ दोन महत्वाच्या संघांनी आपला पाकिस्तान दौरा रद्द केल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या आगामी पाकिस्तान दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानात मालिका खेळणार होता.

14 टी-20, 3 वन-डे आणि 4 टेस्ट मॅच, BCCI कडून 2021-22 च्या हंगामासाठीचं वेळापत्रक जाहीर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT