IPL 2021 : कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?? जाणून घ्या…
करोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळातही बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या सिझनचं युएईत यशस्वीरित्या आयोजन केलं. २९ मार्च २०२० ला सुरु होणारी स्पर्धा करोनामुळे दोनवेळा पुढे ढकलली गेली. अखेरीस १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईत ही स्पर्धा रंगली. यानंतर बीसीसीसीआयने लगेच पुढच्या सिझनसाठीची तयारी सुरु केली आहे. प्रत्येक टीम ओनर्सनी आपल्या संघातील प्रमुख खेळाडूंना रिटेन केल्यानंतर ४ […]
ADVERTISEMENT
करोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळातही बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या सिझनचं युएईत यशस्वीरित्या आयोजन केलं. २९ मार्च २०२० ला सुरु होणारी स्पर्धा करोनामुळे दोनवेळा पुढे ढकलली गेली. अखेरीस १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईत ही स्पर्धा रंगली. यानंतर बीसीसीसीआयने लगेच पुढच्या सिझनसाठीची तयारी सुरु केली आहे. प्रत्येक टीम ओनर्सनी आपल्या संघातील प्रमुख खेळाडूंना रिटेन केल्यानंतर ४ फेब्रुवारीपर्यंत आठही टीम ओनर्स Player Transfer Window च्या माध्यमातून आपल्या संघातील खेळाडूंची अदलाबदल करु शकतात.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयपीएल २०२१ ऐवजी २०२२ मध्ये दोन संघांचा समावेश करण्याला मान्यता दिली. याचसोबत २०२१ मध्ये प्लेअर्सचं मेगा ऑक्शन करण्याऐवजी मिनी ऑक्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१८ साली झालेल्या लिलावात प्रत्येक टीम ओनर्सनी आपल्या खेळाडूंसोबत ३ वर्षांचा करार केला होता. हा करार २०२० मध्ये संपुष्टात आलेला आहे.
२०२१ च्या ऑक्शनसाठी प्रत्येक टीम आपल्या ३ खेळाडूंना कायम राखू शकत व इतर दोन खेळाडूंना Right to Match (RTM) कार्डाद्वारे आपल्या संघात परत घेऊ शकतं. या ऑक्शनसाठी सर्व संघांना ८५ कोटी इतकीच पर्स अमाऊंट ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक टीम प्लेअर्सना Retain करण्यासाठी किती पैसा खर्च करतं यावर त्यांच्याकडे किती रक्कम शिल्लक राहते हे ठरणार आहे.
हे वाचलं का?
प्लेअर्सना रिटेन आणि रिलीज केल्यानंतर आठही टीम ओनर्सकडे सध्या किती पैसे शिल्लक आहेत हे आपण जाणून घेऊयात…
१) किंग्ज इलेव्हन पंजाब – उरलेली रक्कम ५३.२० कोटी
ADVERTISEMENT
२) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – उरलेली रक्कम ३५.९० कोटी
ADVERTISEMENT
३) राजस्थान रॉयल्स – उरलेली रक्कम ३४.८५ कोटी
४) चेन्नई सुपरकिंग्ज – उरलेली रक्कम २२.९० कोटी
५) मुंबई इंडियन्स – उरलेली रक्कम १५.३५ कोटी
६) दिल्ली कॅपिटल्स – उरलेली रक्कम १२.९० कोटी
७) कोलकाता नाईट रायडर्स – उरलेली रक्कम १०.७५ कोटी
८) सनराईजर्स हैदराबाद – उरलेली रक्कम १०.७
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT