Angelo Mathews : न खेळताच फलंदाज होतो बाद, ‘टाइम आऊट’ आहे तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

angelo mathews sri lanka vs bangladesh match timed out in world cup 2023 angelo mathews controversial wicket video
angelo mathews sri lanka vs bangladesh match timed out in world cup 2023 angelo mathews controversial wicket video
social share
google news

Time Out: भारतात सुरु असलेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 (ODI World Cup 2023) मधील अनेक वाद आता समोर येत आहेत. सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी एक असाच मोठा वाद समोर आला आहे. या दिवशी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) श्रीलंका आणि बांगलादेश (Sri Lanka and Bangladesh) यांच्यामध्ये सामना झाला होता. या सामान्यात श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूज (Angelo Matthews) हा अगदी विचित्र पद्धतीने बाद झाला. त्यामुळे मॅथ्यूज अशा पद्धतीने आऊट होणं ही घटना क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

मॅथ्यूज ‘टाइम आऊट’

श्रीलंका आणि बांगलादेश सामना सुरु असताना पंचांनी मॅथ्यूजला ‘टाइम आऊट’ म्हटले, आणि तो बाद झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या अशाप्रकारे एखाद्या खेळाडूला ‘टाइम आऊट’ होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. अँजेलो मॅथ्यूज हा टाइम आऊट ठरला तो क्षण होता, श्रीलंकेच्या 25 व्या षटकावेळचा. हे षटक बांग्लादेश संघाचा कर्णधार आणि फिरकी गोलंदाज शाकिब अल हसनने केले होते. शाकिबने दुसऱ्याच चेंडूवर सदीरा समरविक्रमाला झेलबाद केले. तर त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज पुढचा फलंदाज म्हणून आला होता पण नेमकी त्याचवेळी काही तरी गडबड झाली, आणि हा पुढील प्रसंग घडला.

 

हे वाचलं का?

विनंती हेल्मेट आणण्याची

सामना चालू असताना मॅथ्यूजला त्याला हवे तसे आणि योग्य प्रकारचे हेल्मेट आणता आले नव्हते. त्यामुळे त्याने क्रीजवर येताना पॅव्हेलियनमधील आपल्या सहकाऱ्यांना आणखी एक हेल्मेट आणण्याची विनंती केली. मॅथ्यूजकडून हेल्मेट आणण्याची विनंती करत असतानाच मैदानावरील पंचांकडून मात्र त्याला ‘टाइम आऊट’ देण्यात आले.

ADVERTISEMENT

‘टाइम आउट’ चा नियम ?

क्रिकेटचे संरक्षक असलेल्या मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या 40.1.1 च्या नियमानुसार, विकेट पडल्यानंतर किंवा खेळाडू बाद झाल्यानंतर, पंचाकडून सामना खेळवणे थांबवले गेले नाही तर त्या पुढील खेळाडूला फलंदाजी करण्याची परवानगी देण्यात येते. मात्र सामन्यात पुढील बॉल 3 मिनिटांत टाकणेही गरजेचे असते. त्यावेळी नवा फलंदाज तसं काही करू शकला नाही तर त्याला बाद म्हणूनही घोषित करण्यात येते. त्यालाच ‘टाइम आउट’ असं म्हणतात.तर क्रिकेटच्या सामन्यात नियमानुसार 40.1.2 नुसार, त्या वेळेत म्हणजेच 3 मिनिटामध्ये नवा फलंदाज खेळपट्टीवर आला नाही, तर पंच नियम 16.3 हा नियम पाळला जातो, नियमाप्रमाणेच फलंदाजाला ‘टाइम आऊट’ म्हणून घोषित केले जाते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Deepfake Video: रश्मिका मंदानाचा एवढा बोल्ड व्हिडीओ? हादरवून टाकणारं ‘हे’ प्रकरण काय?

नियमात झाला ‘बदल’

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या सामन्यात मॅथ्यूजच्याबाबतीतही हा नियम लागू करण्यात आला. मात्र या नियमामध्ये 3 मिनिटांचा वेळ 2 मिनिटांनी कमी करण्यात आला आहे. पंचाकडून ‘टाइम आऊट’ घोषित झाले तरीही गेलेली विकेट मात्र गोलंदाजाच्या खात्यात जमा होत नाही. तर वर्ल्ड कप 2023 च्या खेळाच्या परिस्थितीतील नियम 40.1.1 नुसार जर विकेट पडल्यानंतर किंवा षटके संपली नाही किंवा अंपायरने खेळ थांबवलाच नाही तर पुढील फलंदाज किंवा इतर कोणत्याही फलंदाजाकडे 2 मिनिटांचा अवधी असतो. त्यामुळे विकेट पडल्यानंतर पुढील चेंडूसाठी खेळाडूंने सज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे गरज असेल तर येणाऱ्या खेळाडूला मात्र थम्ब्स आऊट देण्यात येते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

क्रिकेट विश्वातील पहिलीच घटना

आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वामध्ये ही घटना प्रथमच घडली आहे, पण याआधी प्रथम श्रेणीतही असे घडले आहे. क्रिकेट विश्वात 6 वेळा खेळाडूंचा वेळ संपल्याची घटना घडली आहे. त्या अशा काही घटनेत भारताच्या हेमुलाल यादवचाही समावेश होतो.

‘टाइम आऊट’ फलंदाज:

-अँड्र्यू जॉर्डन, पूर्व प्रांत विरुद्ध ट्रान्सवाल- पोर्ट एलिझाबेथ (1987-88)
– हेमुलाल यादव, त्रिपुरा विरुद्ध ओडिशा- कटक (1997)
– व्हीसी ड्रॅक्स, बॉर्डर विरुद्ध फ्री स्टेट- ईस्ट लंडन (2002)
– एजे हॅरिस, नॉटिंगहॅमशायर वि डरहम-नॉटिंगहॅम (2003)
– रायन ऑस्टिन, विंडवर्ड आयलंड वि. एकत्रित परिसर आणि महाविद्यालये – सेंट व्हिन्सेंट (2013-14)
– चार्ल्स कुंझे, मॅटाबेलँड टस्कर्स विरुद्ध माउंटेनियर्स – बुलावायो (2017)

‘हेमुलाल’ही टाइम आऊट

भारतात ‘टाइम आऊट’चे हे प्रकरण दुसऱ्यांदा घडले आहे. याआधी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 20 डिसेंबर 1997 रोजी कटक येथे ओडिशाविरुद्धच्या रणजी सामन्यावेळी त्रिपुराच्या हेमुलाल यादवला ‘टाइम आऊट’ देण्यात आला होता. त्यावेळी 9 वी विकेट पडल्यानंतर 11 व्या क्रमांकावर असलेला हेमुलाल यादव काही कारणास्तव तो सामन्यावेळी खाली आला नव्हता. त्यावेळी त्याला ‘टाइम आऊट’ देण्यात आला होता.

सौरव गांगुली आणि ग्रॅमी स्मिथ

यावेळी शाकिबने अपील मागे न घेतल्याने क्रिकेटच्या स्पिरिटवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वी 2006-07 मध्ये न्यूलँड्स येथे झालेल्या कसोटीदरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार ग्रॅमी स्मिथने महान फलंदाज सौरव गांगुलीविरुद्ध ‘टाइम आऊट’ साठी अपील केले नव्हते, तरीही तो उशीरा क्रीजवर पोहोचला होता.

हे ही वाचा >>क्रूरतेचा कळस! गुप्तांगात टाकला एअर पाईप, तरुणाचा तडफडून मृत्यू

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT