Angelo Mathews ने लगेच घेतला Time Out चा बदला! शाकिबला…; पाहा व्हिडिओ

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

angelo mathews vs shakib al hasan mathews shows time out sign to shakib after taking wicket bangladesh vs srilanka
angelo mathews vs shakib al hasan mathews shows time out sign to shakib after taking wicket bangladesh vs srilanka
social share
google news

Angelo Mathews vs Shakib Al hasan, Odi World Cup 2023 : आयसीसीच्या वनडे वर्ल्ड कप सामन्यात सोमवारी बांग्लादेशने (Bangladesh) 3 विकेट राखून श्रीलंकेवर विजय मिळवला. श्रीलंकेच्या (Srilanka) या विजयापेक्षा सर्वाधिक चर्चा अँजलो मॅथ्युजच्या (Angelo Mathews) विकेटची झाली. कारण अंपायरने त्याला टाईम आऊटचा (Time out)  निर्णय देत एकही बॉल न खेळता आऊट करार दिले. बांग्लादेशच्या शाकिब अल हसनने (Shakib Al hasan) अपिल केल्यानंतर आयसीसीच्या नवीन निर्णयानुसार त्याला आऊट देण्यात आले होते. याच विकेटचा बदला आता अँजलो मॅथ्युजने त्याच सामन्यात शकीबल हसनची विकेट घेऊन घेतला. या संदर्भातला व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (angelo mathews vs shakib al hasan mathews shows time out sign to shakib after taking wicket bangladesh vs srilanka)

ADVERTISEMENT

श्रीलंकेची (Srilanka) बॅटींग सुरु असताना 25 व्या ओव्हर दरम्यान ही घटना घडली. ही ओव्हर टाकण्यासाठी बांगलादेश संघाचा कर्णधार आणि फिरकी गोलंदाज शाकिब अल हसन आला होता. शाकिबने दुसऱ्याच बॉलवर सदीरा समरविक्रमाला कॅच आऊट केले.यानंतर अँजेलो मॅथ्यूज पुढचा फलंदाज म्हणून खेळायला मैदानात आला.

हे ही वाचा : Crime: कपटी वहिनीचे अनैतिक संबंध… नवऱ्याला सांगून नणंदेची क्रूर हत्या!

मैदानात येताना मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घेऊन आला. खेळपट्टीवर आल्यानंतर त्याने पॅव्हेलियनमधील सहकारी खेळाडूला दुसरे हेल्मेट आणण्यास सांगितले. याच दरम्यान शाकिबने अंपायरकडे ‘टाइम आऊट’चे अपील केले. त्यानंतर मैदानावरील दोन्ही पंचांनी एकमेकांशी बोलून मॅथ्यूजला ‘टाइम आऊट’ घोषित केले. पंचांच्या निर्णयानंतर मॅथ्यूज निराश झाला आणि त्याला एकही चेंडू न खेळताच मैदान सोडावे लागले.

हे वाचलं का?

नियमानुसार 40.1.1 नुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, नवीन फलंदाज 3 मिनिटांच्या आत पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. नवीन फलंदाज तसे करू शकला नाही, तर त्याला बाद घोषित केले जाते. याला ‘टाइम आउट’ म्हणतात.दरम्यान शाकीबची अपिल आणि अंपायरच्या या निर्णयावर खूप टीका झाली.

विकेट काढून घेतला बदला

श्रीलंका 49.3 ओव्हरमध्ये ऑल आऊट झाली आणि त्यांनी बांग्लादेशसमोर 279 धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशची खराब सुरुवात केली होती. बांग्लादेशचे दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात माघारी परतले. यानंतर फलंदाजीसाठी शकीब अल हसन उतरला होता. शकीबने नजमुल शांटो सोबत बांग्लादेश डाव सावरत संघाला विजयाच्या दिशेने नेले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Murder Case: अल्पवयीन मुलीबरोबर जबरदस्तीनं लग्न, नंतर बलात्कार अन्…

ADVERTISEMENT

दरम्यान शकीबल हसन त्याच्या शतकाच्या अवघ्या 12 धावा दुर असताना अँजलो मॅथ्युज बॉलिंगला आला. आणि मॅथ्युजने शकीबला आऊट करून आपला बदला घेतला. विशेष म्हणजे अँजलो मॅथ्युज टाईम आऊटमुळे बाद झाला होता. त्यामुळे मॅथ्युजने शकीबची विकेट घेताच हातावर टाईम आऊटची साईन करून ‘आता तुझा टाईम आऊट झालाय’ असा संदेश देत त्याची विकेट साजरी केली. अशाप्रकारे मॅथ्यूजने शकीबची विकेट घेऊन आपला बदला घेतला. या विकेटमुळे शाकीबचं शतक देखील हुकलं.

शेवटी या सामन्यात बांग्लादेशने 41.1 ओव्हरमध्ये बांग्लादेशने दिलेले 279 धावांचे आव्हान 3 विकेट राखून पुर्ण केले. बांग्लादेशच्या या विजयानंतर दोन्ही संघाने एकमेकांना शेकहँड देखील केले नाही, अशी लाजिरवाणी घटना देखील घडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT