IPL 2021 : उर्वरित सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा सहभाग निश्चीत नाही
कोरोनामुळे आयपीएलचा चौदावा सिझन बीसीसीआयला मध्यावधीतच स्थगित करावा लागला. यानंतर बीसीसीआय उर्वरित ३१ सामने सप्टेंबर-ऑक्टोबरच्या काळात खेळवण्याचा प्रयत्न करत आहे. २९ मे ला बीसीसीआयच्या सभेत याविषयी चर्चा होणार आहे. परंतू सप्टेंबरमध्ये उर्वरित हंगाम खेळवण्याचा निर्णय घेतला तर ऑस्ट्रेलियन खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील की नाही याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी BCCI […]
ADVERTISEMENT
कोरोनामुळे आयपीएलचा चौदावा सिझन बीसीसीआयला मध्यावधीतच स्थगित करावा लागला. यानंतर बीसीसीआय उर्वरित ३१ सामने सप्टेंबर-ऑक्टोबरच्या काळात खेळवण्याचा प्रयत्न करत आहे. २९ मे ला बीसीसीआयच्या सभेत याविषयी चर्चा होणार आहे. परंतू सप्टेंबरमध्ये उर्वरित हंगाम खेळवण्याचा निर्णय घेतला तर ऑस्ट्रेलियन खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील की नाही याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे.
ADVERTISEMENT
IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी BCCI ने शोधला नवीन पर्याय
टी-२० विश्वचषकाच्या आधी ऑस्ट्रेलियाचा कार्यक्रम चांगलाच व्यस्त आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध ५ टी-२० मॅचची सिरीज खेळणार आहे. या दौऱ्यातही बायो बबल आणि थकव्याचं कारण देऊन काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी माघार घेतली आहे. पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, डॅनिअल सम्स हे विंडीजविरुद्धची मालिका खेळणार नाहीयेत. आयपीएलचा हंगाम मध्यावधीत स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला होता.
हे वाचलं का?
IPL 2021 साठी BCCI दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड दौऱ्याचा बळी देणार?
ऑस्ट्रेलियन सरकारने भारतामधून येणारी प्रवासी विमानसेवा बंद केल्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू पहिले मालदीवमध्ये जाऊन नंतर चार्टर्ड विमानाने ऑस्ट्रेलियात पोहचले. त्यातच वेस्ट इंडिजचा दौरा संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौरा करणार आहे. ऑगस्टमध्ये ही टी-२० मालिका खेळवली जाणार असून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हा दौरा निश्चीत केला आहे. अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्यात आयपीएल खेळवण्यात आल्यास ऑस्ट्रेलियन खेळाडू यात सहभागी होतील याची शाश्वती देता येत नाहीये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT