Ind Vs ban Test Series : बांग्लादेशचं स्वप्न भंगलं; भारतानं मिरपूर टेस्टसह मालिकाही जिंकली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बांगलादेशविरुद्धची मीरपूर कसोटीही भारताने जिंकली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारत हा सामना गमावू शकतो असे वाटत होते, परंतु श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनच्या भागीदारीने टीम इंडियाला सावरलं आणि भारताने हा सामना 3 विकेटने जिंकला. यासह टीम इंडियाने मालिका 2-0 ने जिंकली आहे. टीम इंडियाच्या या विजयाचे हिरो होते रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर, ज्यांनी संघाला संकटातून बाहेर काढले आणि अखेरीस सामना जिंकला.

या सामन्यात बांगलादेशने भारताला 145 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने चौथ्या दिवसाची सुरुवात 45-4 अशा स्कोअरने केली होती, पण बघता बघता सकाळच्या सेशनमध्ये 3 विकेट गेले. अशा स्थितीत भारतावर पराभवाचे संकट ओढावले होते. अखेरीस श्रेयस अय्यर (29 धावा), रविचंद्रन अश्विन (42 धावा) यांच्या अर्धशतकी भागीदारीने (71 धावा) बांगलादेशचे स्वप्न भंगले.

भारतीय विकेट्स –

1- 3: केएल राहुल

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2-12 : चेतेश्वर पुजारा

3-29: शुभमन गिल

ADVERTISEMENT

4-37: विराट कोहली

ADVERTISEMENT

5-56 : जयदेव उनाडकट

6-71: ऋषभ पंत

7-74: अक्षर पटेल

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 4 बाद 45 अशी होती आणि भारताला विजयासाठी 100 धावांची गरज होती. जयदेव उनाडकट आणि अक्षर पटेल ही जोडी क्रीझवर होती. टीम इंडियाने चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकांमध्येच जयदेव उनाडकट, ऋषभ पंत, अक्षर पटेल यांच्या विकेट्स गमावल्या.

भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी भारताने 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टॉप ऑर्डरच्या चार महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळं हा सामना रोमांचक टप्प्यावर आला होता. बांगलादेशने दुसऱ्या डावात 231 धावा केल्या आणि भारतासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले. या मालिकेत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये क्लीन स्वीप करून महत्त्वाचे गुण मिळवण्याच्या कसरतीत गुंतलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 बाद 45 धावा झाल्या होत्या.

भारताचा बांगलादेश दौरा –

पहिला वनडे: बांगलादेश 1 गडी राखून जिंकला

दुसरा वनडे: बांगलादेश 5 धावांनी जिंकला

तिसरा वनडे: भारत 227 धावांनी जिंकला

पहिली कसोटी : भारताने 188 धावांनी जिंकली

दुसरी कसोटी : भारताने 3 विकेट्सने जिंकली

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी रेकॉर्ड

• एकूण कसोटी – 13

• भारत जिंकला – 11

• बांगलादेश जिंकला – 0

• अनिर्णित सामने – 2

    follow whatsapp

    ADVERTISEMENT