India vs Australia : डेव्हिड वॉर्नर मालिकेतून ‘आऊट’; ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

India vs Australia Series :

ADVERTISEMENT

टीम इंडियाने (Team India) मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सुरू असलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील शेवटचे दोन सामने बाकी आहेत, मात्र त्याआधीच ऑस्ट्रेलियन संघाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. (Big blow to Australia, star player David Warner ‘out’ from series)

वॉर्नरच्या डाव्या कोपराला दुखापत झाली असून हेअरलाइन फ्रॅक्चर झालं आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठीच तो मायदेशी परतला आहे. यामुळे वॉर्नर आगामी एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर जाण्याची शक्यता आहे. वॉर्नरमुळे आता ऑस्ट्रेलियाचा जवळपास अर्धा संघ मायदेशी परतला आहे. कर्णधार पॅट कमिन्ससह आतापर्यंत सह खेळाडू मायदेशी परतले आहेत.

हे वाचलं का?

Ind vs Aus: तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका; कर्णधार कमिन्स घरी परतला

ग्लेन मॅक्सवेललही जखमी :

ऑस्ट्रेलियाला कसोटीनंतर टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. पण आता त्या मालिकेपूर्वीही ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल दुखापतीतून सावरल्यानंतर वनडे मालिकेतून पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र देशांतर्गत शेफिल्ड शील्ड ट्रॉफी खेळताना मॅक्सवेलला पुन्हा एकदा जायबंदी झाला आहे. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला.

ADVERTISEMENT

यामुळे मॅक्सवेललाही मैदानाबाहेर जावं लागलं होत. मात्र दुखापत फारशी गंभीर नसल्यामुळे तो फलंदाजीसाठी मैदानावर परतला. पण आता त्याची दुखापत कितपत धोकादायक आहे याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. मॅक्सवेल नोव्हेंबर २०२२ पासून संघापासून दूर आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत पडल्यामुळे त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले.

ADVERTISEMENT

Ind vs Aus test: कांगारू पुन्हा फिरकीच्या जाळ्यात, ऑस्ट्रेलियाची दाणादाण

शेवटच्या दोन कसोटी सामन्यांपूर्वी 6 खेळाडू ऑस्ट्रेलियाला परतले :

मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांपूर्वी डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, लान्स मॉरिस, मॅथ्यू रेनशॉ, अॅश्टन आगर आणि टॉड मर्फी हे खेळाडून ऑस्ट्रेलियाला परतले आहेत. दोन कसोटी सामने गमावल्याने ऑस्ट्रेलियन संघ आधीच अडचणीत आहे. अशात खेळाडूंची दुखापत ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचं कारण बनलं आहे.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नरच्या जागी ट्रेव्हिस हेड शेवटच्या २ कसोटी सामन्यांमध्ये सलामी करताना दिसणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. तर दुसरा सलामीवीर म्हणून उस्मान ख्वाजा असणार आहे. मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर आणि 6 खेळाडू बाद झाल्यानंतर, कांगारू संघ शेवटच्या दोन कसोटीत पुनरागमन करू शकतो की नाही हे पाहावे लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT