Team India new head coach: दोन World Cup जिंकून देणारा 'हा' क्रिकेटर बनला टीम इंडियाचा कोच!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य: AFP
फोटो सौजन्य: AFP
social share
google news

बातम्या हायलाइट

point

टीम इंडियाला मिळाला नवा हेड कोच

point

राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरकडे मुख्य प्रशिक्षक पद

point

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली घोषणा

Gautam Gambhir Appointed new head coach: मुंबई: भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरकडे भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी जबाबदारी आली आहे. यापुढे तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. त्याने राहुल द्रविडची जागा घेतली आहे. नवीन मुख्य प्रशिक्षक (Head Coach) म्हणून गंभीरची नियुक्ती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी केली आहे. (big news for indian cricket team after t20 world cup gautam gambhir becomes new head coach replaces rahul dravid)

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ T20 विश्वचषक 2024 नंतर संपुष्टात आला आहे. 2021 च्या T20 विश्वचषकानंतर द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. जरी त्यांचा कार्यकाळ केवळ वनडे विश्वचषक 2023 पर्यंत होता, परंतु बीसीसीआयने तो नंतर वाढविला होता.

हे ही वाचा>> Team India: रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाहांची मोठी घोषणा

गंभीरच्या मार्गदर्शनाखाली KKR संघ बनला IPL चॅम्पियन 

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनणार याची जोरदार चर्चा सुरू होती. ज्यावर आता जय शहा यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. सध्या भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यानंतर ते श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. जिथे गौतम गंभीर हा मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

IPL 2024 च्या आधी गौतम गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मार्गदर्शक (Mentor) बनला होता. यानंतर त्याने आपल्या मार्गदर्शनाखाली केकेआर संघाला चॅम्पियन बनवलं होतं. दरम्यान, भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीर हा एकमेव उमेदवार होता. प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

हे ही वाचा>> Suryakumar Yadav: 'तो कॅच बसला हातात..', सूर्यकुमारने मराठीतून सांगितला 'त्या' कॅचचा नेमका किस्सा!

2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये मॅच विनिंग इनिंग

42 वर्षीय गौतम गंभीरने 4 डिसेंबर 2018 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. गंभीरने भारतासाठी शेवटची कसोटी 2016 मध्ये राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. गंभीरने 58 कसोटी सामन्यांमध्ये 41.95 च्या सरासरीने 4154 धावा केल्या ज्यात नऊ शतकांचा समावेश आहे.
 
तर गंभीरने 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या आहेत. यामध्ये 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये खेळलेल्या 97 धावांच्या संस्मरणीय खेळीचाही समावेश आहे, ज्यामुळे भारताने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. एकदिवसीय सामन्यात त्याने 11 शतकं ठोकली आहेत. गंभीरने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही आपली छाप सोडली. त्याने 37 सामन्यात सात अर्धशतकांच्या मदतीने 932 धावा केल्या, ज्यात त्याची सरासरी 27.41 होती. 2007 च्या टी-20 वर्ल्डकपच्या विजयी संघातही गंभीरचा समावेश होता. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही गंभीरने 54 चेंडूत 75 धावांची अत्यंत महत्त्वाची  खेळी खेळली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT