Team India: रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाहांची मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

ind vs zim t20 team india jay shah big statement rohit sharma under captaincy wtc final and champions trophy played bcci
"ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाचे मी अनेक अभिनंदन करतो.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाचे अभिनंदन करतो

point

गेल्या एका वर्षात ही आमची तिसरी फायनल होती

point

आम्ही पुढील या दोन्ही स्पर्धांमध्ये विजयी मिळवू

Jay Shah On Rohit Sharma Captaincy : आयसीसीच्या टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या निवृत्तीनंतर कदाचिक तो क्रिकेटमधून देखील संन्यास घेईल अशी चर्चा आहे. असे असतानाच आता बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कर्णधारपदाबाबत मोठी घोषणा केली आहे. रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि चॅम्पियन्स ट्ऱॉफीपर्यंत टीम इंडियाचं नेतृत्व करावं, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता रोहित शर्माच्या खांद्यावरची जबाबदारी वाढली आहे. (ind vs zim t20 team india jay shah big statement rohit sharma under captaincy wtc final and champions trophy played bcci) 

खरं तर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी20 वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचे अभिनंदन करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत बोलताना जय शाह म्हणाले की, "ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाचे मी अनेक अभिनंदन करतो. मी हा विजय प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित करतो. तसेच फायनल सामन्यातील शेवटचे 5 ओव्हर खूप महत्वाचे होते. या शेवटच्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि हार्दिक पांड्या या खेळाडूंनीकेलेल्या कामगिरीबद्दल मला त्यांचे आभार मानायचे आहेत.

हे ही वाचा : Supriya Sule : विधान परिषद निवडणुकीआधी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, पडद्यामागे काय घडतंय?

जय शाह पुढे म्हणाले की, गेल्या एका वर्षात ही आमची तिसरी फायनल होती. जून 23 मध्ये आम्ही डब्ल्यूटीसीमध्ये हरलो. नोव्हेंबर 23 मध्ये आम्ही मने जिंकली पण चषक जिंकू शकलो नव्हतो.पण मी राजकोटमध्ये म्हणालो होतो की, जून 24 मध्ये आम्ही हृदय, कप दोन्ही जिंकू आणि आमच्या कर्णधाराने ते करून दाखवले आहे. त्यामुळे आता पुढील WTC फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. त्यामुळे मला खात्री आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात आम्ही पुढील या दोन्ही स्पर्धांमध्ये विजयी मिळवू, असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जय शाह यांच्या या विधानानंतर आता पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन मोठ्या स्पर्धांमध्ये रोहित शर्माच्याच नेतृत्वात खेळल्या जाणार आहेत. रोहित शर्माच्या जागी नवीन कोणत्याही कर्णधाराची नाव पुढे येण्याची शक्यता मावळली आहे. 

हे ही वाचा : Worli Accident : साडी अडकली तरी थांबला नाही; शिवसेना नेत्याचा मुलगा नंतर...

    follow whatsapp

    ADVERTISEMENT