Supriya Sule : विधान परिषद निवडणुकीआधी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, पडद्यामागे काय घडतंय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

supriya sule at ajit pawar residence katewadi meet ajit pawar mother ncp politics sharad pawar maharashtra politics
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी आज सुप्रिया सुळे दाखल झाल्या होत्या.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काटेवाडीचं घर हे शारदाबाई पवार आणि गोविंदरावांच घर आहे.

point

मी जन्मापासून या घरात राहते.

point

आशाकाकींना नमस्कार करण्यासाठी आले होते.

Supriya Sule Ajit Pawar Residence : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक 12  जुलैला पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी आमदारांची जुळवाजुळव सुरु असताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी आज सुप्रिया सुळे दाखल झाल्या होत्या. यावेळी अजित पवारांसह संपूर्ण कुटुंब घरात उपस्थित होतं. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) या भेटीची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (supriya sule at ajit pawar residence katewadi meet ajit pawar mother ncp politics sharad pawar maharashtra politics) 

सुप्रिया सुळे यांनी या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काटेवाडीचं घर हे शारदाबाई पवार आणि गोविंदरावांच घर आहे. तिथे माझ्या आशा काकी राहतात. मी जन्मापासून या घरात राहते. त्यामुळे मी आशाकाकींना नमस्कार करण्यासाठी आले होते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

हे ही वाचा : Worli Accident : साडी अडकली तरी थांबला नाही; शिवसेना नेत्याचा मुलगा नंतर...

मी घरी गेले (अजित पवारांच्या आई) काकींना नमस्कार केला, काकींना भेटले. सुनेत्रा वहिनींच्या आई होत्या त्यांचे दर्शन घेऊन मी निघाले. शरद पवारांचा कार्यक्रम असल्या कारणाने आम्ही दोघींना भेटून निघालो, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. या दरम्यान अजित पवार यांची भेट झाली नाही का? असा सवाल एका पत्रकाराने केला होता. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,  वारीचे जेवण डाव्या बाजूला असल्या कारणाने माझी अजित पवारांशी भेटही झाली नाही आणि बोलताही आले नाही. पण काकी घरात असल्या कारणाने त्यांची भेट झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासोबत योगेंद्र पवार देखील होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : OBC Reservation : एकनाथ शिंदे ओबीसी मुद्द्यावरून सापडले खिंडीत?

सुप्रिया सुळे- सुनेत्रा पवार आमने सामने 

 निवडणुका संपल्या की  पवार कुटुंबीय एक होतात. याचा प्रत्यय काल बारामतीकरांना अनुभवायला मिळाला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या आमने-सामने आल्या. दोघींनीही एकमेकींना हात उंचावून ओळख दिली. यापूर्वीही निवडणुकीत प्रचाराच्या धमधमीत देखील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी एकमेकींची गळा भेट घेतली होती त्यामुळे बारामतीकर संभ्रमात होते मात्र निवडणूक अटीतटीची झाली आणि सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला.  त्यानंतर आज पुन्हा दोघी आमने सामने आल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या समाज आरतीला या असं म्हणत दोघींनी एकमेकींशी संवाद साधला..

    follow whatsapp

    ADVERTISEMENT