OBC Reservation : एकनाथ शिंदे ओबीसी मुद्द्यावरून सापडले खिंडीत?
OBC Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबरोबर ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. एकीकडे मनोज जरांगे सरकारला लक्ष्य करताहेत, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यानीही आक्रमक भूमिका घेतली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लक्ष्मण हाके यांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या भूमिकेवर सवाल
मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा ऐरणीवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्मण हाकेंनी काय सवाल केला?
Eknath Shinde Laxman Hake OBC Reservation : मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लक्ष्मण हाके यांनी उपोषण थांबवले असले, तरी या आंदोलनाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणे टाळले. हाच मुद्दा आता कळीचा ठरताना दिसत आहे. एकीकडे मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट देतात, मग ओबीसींची बाजू समजून घेण्यासाठी का येत नाही, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे खिंडीत सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Why Eknath Shinde did not visit obc reservation agitation?)
मनोज जरांगे यांच्या काही मागण्यांना विरोध करत लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली होती.
पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रही पाठवले होते. त्याचबरोबर त्यांनी ट्विट करून आंदोलनाला भेट देण्याची मागणीही केली होती. पण, एकनाथ शिंदे आंदोलन स्थळी गेलेच नाही.
शिंदेंच्या भूमिकेबद्दल लक्ष्मण हाकेंचा गंभीर सवाल
पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ आता आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. पुण्यात बोलताना हाके म्हणाले की, "मराठा आंदोलन सोडवण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः दोन वेळा गेले होते. ओबीसी आंदोलन सोडवण्यासाठी राज्य सरकारने पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ व इतर ओबीसी नेत्यांना पाठवले. पण, मुख्यमंत्री आले नाहीत."










