कोच राहुल द्रविडनं केलं क्लियर; बांगलादेशविरुद्ध के.एल राहुल खेळणार की नाही, स्पष्टच सांगितलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत दमदार राहिली आहे आणि 2 सामने जिंकूनही ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. 2 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध सामना आहे, येथे विजय मिळवल्यानंतर उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित होईल. पण या मिशनमध्ये आणखी एक चिंतेची बाब आहे, ती म्हणजे के.एल राहुलच्या फलंदाजीने पहिल्या तीन सामन्यांमध्ये चिंता वाढवली आहे.

ADVERTISEMENT

के.एल राहुलला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळावे की नाही, असे प्रश्न सातत्याने उपस्थित केले जात आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने पत्रकार परिषद घेतली, अशा परिस्थितीत त्यांना के.एल राहुलशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला. के.एल राहुलला संघ व्यवस्थापनाचा पूर्ण पाठिंबा आहे, त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत कोणताही संभ्रम नसल्याचे राहुल द्रविडने स्पष्ट केले आहे.

‘के.एल राहुल हा शानदार खेळाडू आहे, तो दमदार पुनरागमन करेल याची आम्हाला खात्री’ : द्रविड

पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाला, ‘आमच्यासाठी कोण ओपन करेल याबद्दल माझ्या आणि रोहित शर्मामध्ये कोणताही संभ्रम नाही, आम्हाला माहित आहे की के.एल राहुल किती प्रभाव पाडू शकतो. केएल राहुल हा शानदार खेळाडू आहे, तो दमदार पुनरागमन करेल याची आम्हाला खात्री आहे. अशी परिस्थिती जगभरातील सलामीवीरांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे, द्रविड म्हणाला.

हे वाचलं का?

टीम इंडियाचा प्लेइंग-11 मध्ये बदल करण्याचा कोणताही इरादा नाही

राहुल द्रविड म्हणाला की, आमची कृती आणि शब्द हे दाखवतात की आम्ही के.एल राहुलसोबत आहोत. सध्याच्या परिस्थितीत आपण थोडा वेळ काढू शकतो, त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. तो आमच्यासाठी किती महत्त्वाचा खेळाडू आहे हे आम्हाला माहीत आहे. राहुल द्रविडच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, टीम इंडियाचा प्लेइंग-11 मध्ये बदल करण्याचा कोणताही इरादा नाही आणि केएल राहुल बांगलादेशविरुद्धही ओपनिंग करताना दिसणार आहे.

तिन्ही सामन्यात के.एल राहुल सुपरफ्लॉप ठरला आहे

T20 विश्वचषक 2022 मध्ये केएल राहुलचा वाईट टप्पा आत्तापर्यंत टीम इंडियाने या टूर्नामेंटमध्ये तीन सामने खेळले आहेत, ज्यापैकी दोन जिंकले आहेत आणि एक पराभव झाला आहे. केएल राहुल या तिन्हींमध्ये सुपर फ्लॉप ठरला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 4, नेदरलँडविरुद्ध 9 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 धावा केल्या आहेत. त्यामुळेच त्याला प्लेइंग-11 मधून वगळण्याची मागणी होत असून त्याच्या जागी ऋषभ पंतला सलामी देण्यास सांगितले जात आहे.

ADVERTISEMENT

के.एल राहुलचा T20 रेकॉर्ड: 69 सामने, 2159 धावा, 37.87 सरासरी, 2 शतके, 20 अर्धशतके

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT