Tokyo Olympic : कोरोनाचा धोका स्पर्धेदरम्यान टाळता येणार नाही – WHO

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागच्या वर्षी रद्द झालेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यंदाच्या वर्षात खेळवली जाणार आहे. २३ जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेवरही कोरोनाचं सावट कायम असणार आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये आतापर्यंत काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. परंतू किती खेळाडूंना कोरोनाची लागण होते यावरुन ऑलिम्पिक आयोजनाला दोष देता येणार नाही कारण कोरोनाचा धोका टाळणं शक्य नसल्याचं WHO प्रमुखांनी स्पष्ट केलंय.

ADVERTISEMENT

एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच त्याला तात्काळ विलगीकरणात ठेवणं, त्याच्या संपर्कात कोणी आलं होतं का याची तपासणी करणं आणि उपचार करुन संसर्ग रोखणं या निकषांवर ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन यशस्वी की अयशस्वी हे ठरवलं गेलं पाहिजे असंही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने म्हटलं आहे. जगभरातून खेळाडू जपानच्या टोकियो शहरात दाखल होत असल्यामुळे येत्या काळात पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

जपानच्या टोकिया शहरातही काही खेळाडू हे कोरोना पॉजिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे स्पर्धेदरम्यान कोरोनाचा धोका टाळता येणं शक्य नाहीये. जे खेळाडू पॉजि़टीव्ह खेळाडूंच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतःला आयसोलेट करुन सर्व खबरदारी घेऊन सराव करावा असंही WHO ने स्पष्ट केलं आहे. जपानमधील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी ऑलिम्पिक स्पर्धा सुपर स्प्रेडर ठरु शकते असं म्हटलंय. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन कसं करण्यात येतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT