T-20 World Cup मध्ये यंदा पहिल्यांदाच DRS चा वापर, ICC चा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ओमान आणि युएईत होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकात यंदा पहिल्यांदाच DRS (Decision Review System) प्रणालीचा वापर होणार आहे. आयसीसीने याबद्दलची घोषणा केली असून १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे.

ADVERTISEMENT

सर्व संघांना या स्पर्धेत प्रत्येक इनिंगमध्ये दोन DRS च्या संधी मिळणार आहेत. कोविड-१९ मुळे यंदा टी-२० विश्वचषकात एलिट पॅनल अंपायर्ससोबतच काही कमी अनुभवी असणाऱ्या अंपायर्सनाही संधी मिळू शकते. हे लक्षात ठेवूनच आयसीसीच्या गव्हर्निंग बॉडीने टी-२० विश्वचषकासाठी दोन रिव्ह्यू मिळणार असं जाहीर केलं.

मेहनतीचं फळ ! SRH चा युवा बॉलर उमरान मलिकला टी-२० वर्ल्डकपसाठी नेट बॉलर म्हणून संधी

हे वाचलं का?

याआधी झालेल्या टी-२० विश्वचषकात DRS चा समावेश करण्यात आला नव्हता. २०१८ साली कॅरेबिअन बेटांवर झालेल्या महिला टी-२० विश्वचषकात पहिल्यांदा DRS चा वापर करण्यात आला होता. यानंतर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या महिला टी-२० विश्वचषकातही DRS चा वापर झाला होता.

ICC ने यंदाच्या टी-२० विश्वचषकसाठी सामनाधिकारी आणि पंचांची यादी जाहीर केली आहे. भारताच्या नितीन मेनन आणि जवागल श्रीनाथ यांना या यादीत स्थान मिळालं आहे.

ADVERTISEMENT

सामनाधिकारी – डेव्हिड बून, जेफ क्रो, रंजन मदुगले, जवागल श्रीनाथ

ADVERTISEMENT

पंच – ख्रिस ब्राऊन, अलिम दार, कुमार धर्मसेना, मारियस इरॅस्मस, ख्रिस गॅफनी, मायकल गॉग, अॅड्रीअन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलब्रो, नितीन मेनन, एहसान रझा, पॉल राफेल, लँगटॉन रुसेरे, रॉड टकर, जोएल विल्सन, पॉल विल्सन

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT