होय, मी देखील नैराश्याचा सामना केलाय ! विराट कोहलीने दिली कबुली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

क्रिकेटपटूंना येणारं नैराश्य हा काही दिवसांपूर्वीच चर्चेत असलेला मुद्दा होता. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचं कारण देत क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. यानंतरही अनेक प्लेअर्सनी आपणही नैराश्याचा सामना केल्याचं सांगितलं होतं. भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीनेही आपण नैराश्याचा सामना केल्याचं कबुल केलंय. एरवी मैदानात नेहमी आक्रमक असलेल्या विराट कोहलीला कधीकाळी नैराश्याचा सामना करावा लागला होता ही बाब पहिल्यांदा फॅन्सच्या समोर येते आहे.

ADVERTISEMENT

माजी क्रिकेटपटू आणि लेखक मार्क निकोलस याच्या Not Just Cricket या पॉडकास्टमध्ये बोलत असताना विराट कोहलीने याबद्दलची कबुली दिली आहे. खराब कामगिरीनंतर मला खूप एकटं असल्यासारखं वाटलं होतं असं विराटने सांगितलं. “तुमच्याकडून रन्स होत नसतात, ही गोष्ट डोक्यात ठेवून दररोज सकाळी उठणं सोपं नसतं. प्रत्येक बॅट्समनला आपल्या कारकिर्दीत एका स्टेजला असं वाटत असणार. काहीवेळा कोणतीच गोष्ट तुमच्या नियंत्रणात नसल्यासारखं होतं. तो काळ असा होता की मी काहीही करु शकत नव्हतो. या जगातला मी सगळ्यात एकटा माणूस असल्याची भावना माझ्या मनात होती.”

इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर विराटने स्वतःच्या कामगिरीत सुधारणा केली. सध्या विराटच्या बॅटींगचा प्रत्येक बॉलरने धसका घेतलेला आहे. “त्या काळात मला काय वाटतं होतं हे कोणालातरी सांगावं अशा व्यक्ती माझ्या आजुबाजूला होत्या. पण मनातली घालमेल समजून घेण्यासाठी कधीकधी तज्ज्ञ व्यक्तींची गरज असते. आपल्याला काय वाटतंय हे समोरच्याने समजणंही गरजेचं असतं.” आपल्या आयुष्यातील नैराश्याच्या काळाबद्दल विराट कोहली बोलत होता. सध्या विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अहमदाबादमध्ये असून इंग्लंडविरुद्ध मोटेरा मैदानावर भारत डे-नाईट टेस्ट मॅच खेळणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT