Shane Warne Death: धक्कादायक.. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नचं वयाच्या 52व्या वर्षी निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त काही वेळापूर्वीच हाती आलं आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. निधनसमयी शेन वॉर्न हा थायलंडमध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार, शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्येच होता जिथे तो बेशुद्धावस्थेत आढळून आला.

शेन वॉर्नच्या मॅनेजमेंटने जारी केलेल्या एका निवेदनात त्याचा मृत्यू थायलंडमधील कोह सामुई येथे झाल्याचे म्हटले आहे. ‘शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, त्याला पुन्हा जिवंत करता आले नाही,’ असे निवेदनात म्हटले आहे.

‘त्याचे कुटुंब यावेळी गोपनीयतेची विनंती करत आहे आणि योग्य वेळी अधिक तपशील प्रदान केला जाईल,” असंही शेन वॉर्नच्या मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे. गुरुवारीच शेन वॉर्नने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर थायलंडमधील त्याच्या व्हिलाचा फोटो शेअर केला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शेन वॉर्न हा त्यांच्या जादूई फिरकीसाठी क्रिकेट विश्वात ओळखला जायचा 1993 च्या अॅशेस दरम्यान मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत शेन वॉर्नने इंग्लंडच्या माईक गेटिंगला ज्या चेंडूवर बोल्ड केलं होतं तो चेंडू क्रिकेटच्या इतिहासातील ‘सर्वोत्तम चेंडू’ असल्याचे आजही म्हटले जाते. त्या एका चेंडूने वॉर्नचे अवघं आयुष्यच बदलून टाकलं होतं.

आपल्या मनगटी जादूने वॉर्नने आपल्या काळातील जवळपास सर्वच दिग्गजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं होतं. वॉर्नने त्याच्या 145 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत तब्बल 708 बळी घेतले होते, जे मुथय्या मुरलीधरन (800 विकेट) नंतर कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च विकेट्स आहेत.माहितीनुसार, शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्येच होता जिथे तो बेशुद्धावस्थेत आढळून आला.

ADVERTISEMENT

कधीही कर्णधार बनू न शकल्याची खंत

ADVERTISEMENT

शेन वॉर्नने शेवटची कसोटी जानेवारी 2007 मध्ये खेळली होती. 1999 मध्ये तो ऑस्ट्रेलिया संघाचा उपकर्णधारही बनला होता पण त्याला कर्णधार होण्याची संधी कधीच मिळाली नाही. तसं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर, वॉर्नने प्रथमच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं होतं आणि आयपीएलच्या पहिल्या सीजनचं विजतेपदही पटकावून दिलं होतं.

पाचच दिवसांपूर्वी रशिया-युक्रेन युद्धाबाबत दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने पाचच दिवसांपूर्वी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने संदेश लिहून रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले होते. वॉर्नने ट्विट करून युक्रेनचे समर्थन देखील केले होते आणि रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचेही म्हटले होते.

खराब खेळासाठी माजी पाकिस्तानी कॅप्टनने पैशांची ऑफर दिली, दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचा गौप्यस्फोट

दरम्यान, शेन वॉर्नच्या अशा अकाली निधनाने संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या कारकीर्दीत वॉर्नने आपल्या फिरकीच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT