कोहलीच नाही, तर ‘या’ दिग्गज कर्णधारांनाही BCCI ने अचानक दाखवलाय बाहेरचा रस्ता, कारण…

मुंबई तक

विराट कोहलीची भारताच्या वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन केलेली उचलबांगडी हा सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने अनेक गौप्यस्फोट करत आपली नाराजी जाहीर व्यक्त केली. विराटच्या या स्पष्टीकरणानंतर चाहते बीसीसीआयवर नाराज आहेत. आतापर्यंत भारताचं यशस्वी नेतृत्व केलेल्या विराटसाठी बीसीसीआयने चार कौतुकाचे शब्दही न वापरल्यामुळे अनेकांनी बीसीसीआय आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

विराट कोहलीची भारताच्या वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन केलेली उचलबांगडी हा सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने अनेक गौप्यस्फोट करत आपली नाराजी जाहीर व्यक्त केली. विराटच्या या स्पष्टीकरणानंतर चाहते बीसीसीआयवर नाराज आहेत. आतापर्यंत भारताचं यशस्वी नेतृत्व केलेल्या विराटसाठी बीसीसीआयने चार कौतुकाचे शब्दही न वापरल्यामुळे अनेकांनी बीसीसीआय आणि विशेषकरुन सौरव गांगुलीला खलनायक ठरवलं आहे.

परंतू कर्णधारांची उचलबांगडी आणि बीसीसीआय यांचं एक वेगळंच नातं आहे. याआधीही अनेक दिग्ग्ज खेळाडू आणि बीसीसीआयमध्ये वाद निर्माण झाला, ज्यानंतर बीसीसीआयने कर्णधारांना अशाच पद्धतीने हटवलं आहे.

१) राजघराण्यातून आल्यामुळे मिळाली भारताची कॅप्टन्सी –

सी.के. नायडू हे भारताच्या कसोटी संघाचे पहिले कर्णधार मानले जातात. नायडू आपल्या फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखले जायचे. फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये १२ हजार पेक्षा जास्त धावा आणि ४०० विकेट ही त्यांची कामगिरी होती. भारताकडून नायडू यांनी सात कसोटी सामने खेळले ज्यात दोन अर्धशतकही झळकावली. परंतू नायडूंच्या आधी भारतीय संघाची जबाबदारी होती ती महाराजकुमार ऑफ विजयनगरम यांच्याकडे. परंतू ही जबाबदारी त्यांना फक्त राजघराण्यातून आलेले असल्यामुळे मिळाली होती.