Glenn Maxwell: आरारारा खतरनाक! मॅक्सवेलने T-20 सामन्यात पाडला षटकारांचा पाऊस, रोहित शर्माचा 'तो' महाविक्रम मोडला

मुंबई तक

Glenn Maxwell Record In T20 : बिग बॅश लीग 2024-25 मध्ये ग्लेन मॅक्सवेलने धमाकेदार अंदाजात फलंदाजी करून क्रिकेटमध्ये खळबळ उडवली आहे. बीबीएलच्या 40 व्या सामन्यात मेलबर्न स्टार्सने होबार्ट हरिकेन्सचा 40 धावांनी पराभव केला.

ADVERTISEMENT

Glenn Maxwell Breaks Rohit Sharma Record
Glenn Maxwell Breaks Rohit Sharma Record
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ग्लेन मॅक्सवेलने टी-20 मध्ये केला धमाका!

point

मॅक्सवेलने मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम

point

त्या सामन्यात मॅक्सवेलने पाडला धावांचा पाऊस

Glenn Maxwell Record In T20 : बिग बॅश लीग 2024-25 मध्ये ग्लेन मॅक्सवेलने धमाकेदार अंदाजात फलंदाजी करून क्रिकेटमध्ये खळबळ उडवली आहे. बीबीएलच्या 40 व्या सामन्यात मेलबर्न स्टार्सने होबार्ट हरिकेन्सचा 40 धावांनी पराभव केला. या सामन्यात मेलबर्न स्टार्सकडून खेळताना मॅक्सवेलने 32 चेंडूत 76 धावांची तुफीनी खेळी केली. या इनिंगमध्ये मॅक्सवेलने 5 चौकार आणि 6 षटकार ठोकले. मॅक्सवेलच्या इनिंगच्या जोरावर मेलबर्न स्टार्सने 20 षटकात 5 विकेट्स गमावून 219 धावा केल्या. त्यानंतर होबार्ट हरिकेन्सच्या टीमने या धावांचा पाठलाग करत 19.3 षटकात 179 धावाच केल्या. मॅक्सवेलला या वादळी खेळीसाठी प्लेयर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला.

ग्लेन मॅक्सवेलने मोडला रोहित शर्माचा विक्रम

टी-20 क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेलने रोहित शर्माचा एक खास विक्रम मोडला आहे. मॅक्सवेलने बीबीएलच्या या सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. मॅक्सवेलने त्याच्या इनिंगमध्ये 6 षटकार ठोकले. ही कामगिरी करत मॅक्सवेलने टी-20 मध्ये सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. मॅक्सवेल आता सर्वात जास्त षटकार ठोकण्याच्या यादीत सातव्या नंबरवर पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत 458 सामन्यांमध्ये 528 षटकार ठोकले आहेत. तर रोहित शर्माच्या नावावर 448 सामन्यांमध्ये 435 इनिंगमध्ये फलंदाजी करून आतापर्यंत 525 षटकार ठोकले आहेत.

हे ही वाचा >> Akshay Shinde Encounter: बदलापूर बलात्कार प्रकरणात अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद! 5 पोलिसांविरुद्ध खटला चालणार

पंजाब किंग्जसाठी गुड न्यूज

या सीजनमध्ये मॅक्सवेलने बीबीएलमध्ये धमाका केला आहे. यामुळे पंजाब किंग्जमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असेल. या आयपीएलच्या लिलावात मॅक्सवेलला पंजाब किंग्जने 4 कोटी रुपयांत खरेदी करून त्यांच्या टीममध्ये सामील केलं आहे. अशातच मॅक्सवेलच्या या जबरदस्त फॉर्मचा पंजाब किंग्जला किती फायदा होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा >> Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्रानं केलं लग्न, पाहा कोण आहे नववधू

हे वाचलं का?

    follow whatsapp