Akshay Shinde Encounter: बदलापूर बलात्कार प्रकरणात अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद! 5 पोलिसांविरुद्ध खटला चालणार

मुंबई तक

Akshay Shinde Encounter Case Latest Update: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेंचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मोठी अपडेट

point

अक्षय शिंदेंच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार

point

हायकोर्टानं नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण

Akshay Shinde Encounter Case Latest Update: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेंचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. या एन्काउंटरबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अशातच या प्रकरणाची सुनावणी आज मुंबई हायकोर्टात पार पडली. दरम्यान, अक्षयच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय. त्यामुळे या पाच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे. मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला गेला आहे. या अहवालानुसार, पोलीस कर्मचारी ही परिस्थिती हाताळू शकले असते. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा अहवाल न्यायालयात वाचून दाखवला. दरम्यान, अक्षय शिंदेंचा एन्काउंटर संशयास्पद असून याला पाच पोलीस जबाबदार असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. 

बदलापूर प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल 

काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. वडेट्टीवार ट्वीटरवर म्हणाले, "बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे. त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेचे बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजप संस्थाचालकांवर कारवाई झालीच नाही तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर करून भाजपशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले.

हे ही वाचा >> Kolkata Rape And Murder Case: डॉक्टर बलात्कार-खून प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेप, कोर्टाचा मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे. या एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. कारण ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा न्याय‘ म्हणून स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटर चे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत आहे".

हे ही वाचा >> Yogesh Mahajan Death : सेटवर आला नाही, फ्लॅटचा दरवाजा तोडल्यानंतर मृतावस्थेत आढळला अभिनेता...

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,  कुणाला वाचवण्यासाठी हा फेक एन्काउंटर केला गेला. सरकारच्या दबावात हा फेक एन्काउंटर केला गेला आहे. अक्षय शिंदेंने पोलिसांकडे असलेली रिव्हॉल्वर हिसकावून स्वत:वर गोळी झाडली होती, त्याचवेळी ही बाब समोर आली होती की, पोलिसांकडून कोणी रिव्हॉल्वर हिसकावून घेऊ शकत नाही. हे अशक्य आहे. त्या रिव्हॉल्वर अक्षय शिंदेंचे फिंगर प्रिंट नाहीयत, हे कुणाच्या सांगण्यावरून आणि कोणाला वाचवण्यासाठी करण्यात आलं, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp