IPL 2022: फक्त खेळाडू नाही मैदानाची काळजी घेणाऱ्या Groundman ना ही आता फाईव्हस्टार ट्रिटमेंट
– पारस दामा, मुंबई प्रतिनिधी आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला यंदा मुंबई आणि पुणे शहरात सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची भिती लक्षात घेता खेळाडू आणि स्पर्धेशी निगडीत अन्य लोकांना जास्त प्रवास करायला लागू नये यासाठी यंदाच्या स्पर्धे मुंबई आणि पुणे या दोन शहरांतील ४ मैदानांवर खेळवल्या जात आहेत. यात आयपीएलने आणखी एक भर घातली असून मैदानांची […]
ADVERTISEMENT

– पारस दामा, मुंबई प्रतिनिधी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला यंदा मुंबई आणि पुणे शहरात सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची भिती लक्षात घेता खेळाडू आणि स्पर्धेशी निगडीत अन्य लोकांना जास्त प्रवास करायला लागू नये यासाठी यंदाच्या स्पर्धे मुंबई आणि पुणे या दोन शहरांतील ४ मैदानांवर खेळवल्या जात आहेत. यात आयपीएलने आणखी एक भर घातली असून मैदानांची काळजी घेणाऱ्या Groundman ना ही आता पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे.
यंदाच्या हंगामात सुरुवातीला २५ टक्के आणि त्यानंतर ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामने खेळवले जात आहेत. मैदानांची काळजी घेणाऱ्या Groundman ना यंददा कॅडबरी कंपनीने गिफ्ट दिलं असून त्यांची राहण्याची सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केली आहे. इतकच नव्हे तर त्यांना प्रसिद्ध सेलिब्रेटी डिजायनर मसाबा ने डिजाईन केलेल्या खास जर्सीही देण्यात आल्या आहेत. याचसोबत त्यांना मैदानातून हॉटेलवर जायला-यायला वेगळ्या बसची सोय आणि सोबतच हॉटेलमध्ये स्वतंत्र जेवणाची सोय करण्यात आली आहे.
मैदानांची काळजी घेणाऱ्या या Groundman साठी हा एखाद्या राजमहालात वावरण्याचा अनुभव आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात १९८५ पासून कार्यरत असलेल्या वसंत मोहीतेंनी याबद्दल आपल्या भावना बोलून दाखवल्या. “माझ्यासाठी हा अनुभव एखाद्या स्वप्नासारखा आहे. पहिले मॅचच्या दिवशी तयारीसाठी आम्ही मैदानातच रहायचो. परंतू यंदा स्पर्धेला सुरुवात होण्याआधी मला मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की यंदा तुमच्या राहण्याची सोय २ महिने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केलेली आहे.”










