Hardik Pandya : "जे लोक मला एक टक्काही...", रडतच हार्दिकने सांगितल्या वेदना

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

hardik pandya emotional statement after team india won world cup t20 world cup 2024 ind vs sa final
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या ऑलराऊंडर खेळाडूने त्याच्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
social share
google news

Hardik Pandya, T20 World Cup 2024 : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात 7 धावांनी पराभव करून टी20  वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. टीम इंडियाला (Team India) तब्बल 13 वर्षानंतर ही कामगिरी करता आली आहे. या विजयाचे श्रेय टीम इंडियातील सर्वच खेळाडूंना जाते. यात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या ऑलराऊंडर खेळाडूने त्याच्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच या ट्रोलिंगवर तो सामन्यानंतर व्यक्तही झाला आहे. नेमका तो काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात. (hardik pandya emotional statement after team india won world cup t20 world cup 2024 ind vs sa final) 

ADVERTISEMENT

हार्दिक पांड्याने फायनल सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली. हार्दिकने तीन ओव्हरमध्ये 20 धावा देत 3 विकेट घेतले होते. तसेच शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिकने दक्षिण आफ्रिकेला 16 धावा करू दिल्या नाहीत. हार्दिकने हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर आणि कागिसो रबाडा यांची विकेट घेतली. हार्दिक पंड्याने या वर्ल्ड कपमध्ये बॅट आणि बॉलने उत्कृष्ट कामगिरी करून टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हे ही वाचा :  T20 World Cup ट्रॉफीसोबत 'टीम इंडिया'ला मिळाले 'इतके' कोटी; इतर संघांना किती कोटी?

खरं तर आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये हार्दिक पंड्याला रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार बनवल्यामुळे त्याला  ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. तसेच मुंबई इंडियन्स आणि स्वतःच्या खराब कामगिरीनंतर हार्दिक टीकाकारांच्या निशाण्यावर आला होता. मात्र आता हार्दिकने टी20 वर्ल्ड कपमध्ये जी कामगिरी केली आहे. या कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. 

हे वाचलं का?

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना हार्दिक म्हणाला,  'माझा सन्मानावर विश्वास आहे. जे लोक मला एक टक्काही ओळखत नाहीत ते मला इतकं बोलले. पण लोक बोलले मला याचा काही फरक पडला नाही. मी नेहमी मानतो की शब्दांनी उत्तर देऊ नये, परिस्थिती उत्तर देते. वाईट काळ कायमचा राहत नाही. आपण जिंकलो किंवा हरलो तरी प्रतिष्ठा राखणे महत्वाचे आहे. 

हे ही वाचा :  Rohit Sharma : कोहलीनंतर रोहित शर्मानेही घेतला 'तो' निर्णय, म्हणाला...

हार्दिक पुढे म्हणाला, 'चाहते आणि सर्वांना सभ्यपणे जगायला शिकावे लागेल. आपले आचरण चांगले असले पाहिजे. मला खात्री आहे की आता ते लोक आनंदी असतील. खरे सांगायचे तर मला मजा येत होती. आयुष्य बदलून टाकणाऱ्या अशा संधी फार कमी लोकांना मिळतात. या हालचालीचा विपरीत परिणाम होऊ शकतो पण मला ग्लास अर्धा भरलेला दिसतो, अर्धा रिकामा नाही.

ADVERTISEMENT

 रोहित आणि विराटसाठी मी खूप आनंदी आहे. भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज जे या विजयाचे पात्र होते. या फॉरमॅटमध्ये त्याच्यासोबत खेळताना मजा आली. त्याची उणीव भासेल पण यापेक्षा चांगला निरोप असूच शकत नाही, असे देखील हार्दिक पांड्या म्हणाला आहे. 
  
 दरम्यान आता रोहित शर्माच्या T20I मधून निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याला या फॉरमॅटमध्ये भारताचा पुढचा कर्णधार बनवले जाऊ शकते. 2026 साली भारत आणि श्रीलंकेत टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT