World Cup 2023 : हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर, ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री
हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मात्र तो सेमी फायनल आधी मैदानात वापसी करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण आता वर्ल्ड कपमधून आऊट झाला आहे.
ADVERTISEMENT
Hardik Pandya Out from Icc World Cup 2023 : आयसीसी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे सेमी फायनलआधी टीम इंडियाला (Team India) हा मोठा झटका बसला आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मात्र तो सेमी फायनल आधी मैदानात वापसी करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण आता वर्ल्ड कपमधून आऊट झाला आहे. (hardik pandya ruled out of the odi world cup 2023 prasidh krishna allrounder replace team india)
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पुण्यात खेळवल्या गेलेल्या बांग्लादेशविरूद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. पायाने चौकार अडवताना हार्दिकला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर हार्दिक पंड्याला न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरूद्धच्या सामन्याला मुकावे लागले होते. त्यामुळे तो सेमी फायनल आधी मैदानात वापसी करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता तो वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे.
हे ही वाचा : Maratha Reservation : मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर! ‘वर्षा’ बंगल्यावरील बैठकीत काय घडलं? Inside Story
प्रसिद्ध कृष्णाची संघात एन्ट्री
टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर पडला आहे. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये तो टीम इंडियासाठी कोणताही सामना खेळणार नाही. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा (prasidh krishna) संघात एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता रोहित त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : उद्धव ठाकरे बद्रीनाथला गेले, पण.. घडलं भलंतच राजकारण!
दरम्यान टीम इंडियाने नुकतेच श्रीलंकेचा पराभव करून सेमी फायनलचं स्थान पक्क केले आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील 7 ही सामने जिंकले आहेत. एकाही सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया 14 गुणांसह पहिल्या स्थानी आहे, तर साऊथ आफ्रिका 12 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही टीम सेमी फायनलमध्ये दाखल झाल्या आहेत. तर इतर दोन जागांसाठी संघातमध्ये लढत सुरु आहेत.
आता टीम इंडियाला 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध उर्वरित सामने खेळायचे आहेत. यानंतर (15 किंवा 16 नोव्हेंबर) सेमी फायनल होणार आहे. त्यानंतर 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कप फायनल होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT