Rohit Sharma Virat Kohli : विराट-रोहितने एकत्र घेतला संन्यास, पण कुणाची संपत्ती जास्त?
Virat Kohli Rohit Sharma Retirement T20 : आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एकत्रच निवृत्ती घेतली. दोघांचे क्रिकेटमधील योगदान अतुल्य आहे, पण दोघांपैकी कुणाची कमाई सर्वाधिक आहे?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विराट कोहली, रोहित शर्माची टी20 क्रिकेटमधून निवृत्ती

विराट कोहली-रोहित शर्माकडे किती आहे संपत्ती?

विराट कोहली, रोहित शर्माकडे कोणत्या कार आहेत?
Virat Kohli and Rohit Sharma T20 Retirement : भारताने टी20 विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून विजेतेपद पटकावले आहे. टी20 विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून भारत दुसऱ्यांदा या फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनला आहे. पण, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीच्या घोषणेची चर्चा जास्त होत आहे. या दोघांनी टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण दोघांपैकी कुणाची कमाई जास्त आहे?
विराट कोहली T20 विश्व चषकाच्या फायनलमध्ये 76 धावांची इनिंग खेळून 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला, तर रोहित शर्माने उत्तमपणे संघाचे नेतृत्व केले. ज्यामुळे टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. विजयाचा जल्लोष सुरू असताना विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून संन्यास घेतला.
13 वर्षांनंतर विश्व चषक जिंकण्याचा दुष्काळ संपल्यानंतर रोहित आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून एकत्र निवृत्ती घेतली. आता जाणून घेऊया विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांची संपत्ती किती आहे?
रोहित शर्माची एकूण संपत्ती किती आहे?
कर्णधार रोहित शर्मा कमाईच्या बाबतीत इतर खेळाडूंपेक्षा कमी नाही. रिपोर्टनुसार, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची 2023 मधील एकूण संपत्ती सुमारे $26 दशलक्ष म्हणजे 215 कोटी रुपये आहे. मॅच फी, विविध ब्रँड एंडोर्समेंट आणि लीग क्रिकेट हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत.