Gautam Gambhir: 'टीम इंडिया'च्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीर किती घेणार पगार?

मुंबई तक

Gautam Gambhir Salary : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी 9 जुलै रोजी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी (हेड कोच) गौतम गंभीरचे नाव जाहीर केले. अधिकृतपणे, राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून गौतम गंभीरची निवड करण्यात आली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गौतम गंभीरचा नेमका पगार किती आहे?

point

गौतम गंभीरसाठी पुढील तीन वर्ष कशी असणार?

Gautam Gambhir Salary : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी 9 जुलै रोजी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी (हेड कोच) गौतम गंभीरचे नाव जाहीर केले. अधिकृतपणे, राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून गौतम गंभीरची निवड करण्यात आली. गौतम गंभीर 2027 पर्यंत टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहील. अलिकडेच IPL 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला आपल्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन बनवणाऱ्या गौतम गंभीरचा कार्यकाळ 27 जुलैपासून सुरू होईल. यासर्वात, गौतम गंभीरचा पगार किती?, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आपल्या मुख्य प्रशिक्षकाला किती पैसे देत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (How much salary will Gautam Gambhir get for the post of head coach of Team India)

गौतम गंभीरचा नेमका पगार किती आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीची आर्थिक औपचारिकता अद्याप पूर्ण झालेली नाही. त्याच्या पगाराविषयी अद्याप निर्णय झालेला नाहीये.  पण गंभीरला राहुल द्रविडपेक्षा जास्त पगार मिळू शकतो, असंही म्हटलं जात आहे. विश्वचषक जिंकवणाऱ्या द्रविडला प्रशिक्षक म्हणून 12 कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो.

हेही वाचा : Vidhan Parishad Election: दोन वर्षांपूर्वी 'याच' निवडणुकीने महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप, आज पुन्हा...

गौतम गंभीरसाठी पुढील तीन वर्ष कशी असणार?

गंभीरसाठी यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात समोर येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वोत्तम सपोर्ट स्टाफ असणे. एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) प्रशिक्षकांसोबत कोण जवळून काम करेल, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी गंभीरला स्वतःची टीम मिळेल, असे कळते. गंभीर म्हणाला, 'क्रिकेट ही माझी आवड आहे आणि मी बीसीसीआय, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण, सपोर्ट स्टाफ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंसोबत काम करण्यास उत्सुक आहे. कारण, आम्ही आगामी स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी काम करत आहोत.

हेही वाचा : Pooja Khedkar: 'चोराला सोडा...' IAS पूजा खेडकरांनी केलेला थेट DCP ला कॉल, नवा कारनामा आला समोर

 

गंभीरच्या कोअर सपोर्ट स्टाफमध्ये कोण असेल याबाबतही उत्सुकता आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) अकादमीचे प्रमुख अभिषेक नायर, जो IPL फ्रँचायझी KKR च्या महत्त्वाच्या रणनीतीकारांपैकी एक आहे, त्याच्या सहभागाबद्दल बोललं जात आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने गोलंदाजी प्रशिक्षकासाठी एल बालाजी आणि झहीर खान या दोन संभाव्य उमेदवारांची नावे पुढे केली आहेत. माहितीनुसार, आर विनय कुमारचे नाव देखील समोर येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp