Vidhan Parishad Election: दोन वर्षांपूर्वी 'याच' निवडणुकीने महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप, आज पुन्हा...

मुंबई तक

Vidhan Parishad Election 2024: महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. असेच चित्र दोन वर्षांपूर्वी 10 जागांसाठी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत दिसले होते. त्यावेळच्या एका राजकीय घटनेने केवळ सरकारचेच नव्हे तर शिवसेनेचेही भवितव्य बदलले होते.

ADVERTISEMENT

दोन वर्षांपूर्वी याच विधानपरिषद निवडणुकीने महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप,
दोन वर्षांपूर्वी याच विधानपरिषद निवडणुकीने महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप,
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दोन वर्षापूर्वी विधानपरिषद निवडणुकीनंतर घडलेला मोठा उलटफेर

point

विधानपरिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेला सत्तापालट

point

यंदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय गणित कसं असणार?

Vidhan Parishad Election and Maharashtra Politics: मुंबई: महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. असेच चित्र दोन वर्षांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं होतं. त्यावेळच्या एका राजकीय घटनेने केवळ सरकारचेच नव्हे तर शिवसेनेचेही भवितव्य बदललं. (vidhan parishad election 2024 the political earthquake that occurred in maharashtra two years ago with the same vidhan parishad election what will happen today)

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज म्हणजेच 12 जुलै रोजी मतदान पार पडलं. आमदारांची एकजूट राखण्यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्सपासून डिनर डिप्लोमसीपर्यंत सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडी यांनी आमदारांना एकसंध ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काय घडलं होतं?

दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी 20 जून 2022 रोजी मतदान झालं होतं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले होते. तर भारतीय जनता पक्षाने पाच उमेदवार उभे केले होते.  उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी 287 सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या 26 सदस्यांची मते आवश्यक होती. म्हणजेच त्यावेळी कोटा हा 26 चा होता.

त्यावेळी मविआचे संख्याबळ हे 151 आमदार होते. ज्यामध्ये शिवसेनेचे 55, काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादीचे 52 आमदार होते. सहाव्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी युतीला पाच आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. तर भाजपचे संख्याबळ 106 आमदार होते. पाचही उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी 130 मतांची आवश्यकता होती आणि चार उमेदवारांचा विजय सुनिश्चित केल्यानंतर पक्षाकडे पाचव्या उमेदवारासाठी फक्त दोन मते शिल्लक होती. मात्र भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आणि पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने एकूण 134 मते मिळाली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp