T20 World Cup : जाणून घ्या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक, भारताचे सामने कोणत्या दिवशी होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

यंदाच्या वर्षी युएईत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं संपूर्ण वेळापत्रक आज आयसीसीने जाहीर केलं आहे. भारतात कोरोनाच्या परिस्थितीमुळे यंदाची स्पर्धा ओमान आणि युएईत खेळवली जाईल. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या काळात खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेत भारतासमोर पहिलं आव्हान २४ ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं असणार आहे.

ADVERTISEMENT

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे गट आधीच जाहीर झाले आहेत. पहिल्या फेरीत ८ संघ सुपर १२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. आयर्लंड, नेदरलँड्स, श्रीलंका आणि नामिबियाला अ गटात, तर ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेशला ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील फक्त अव्वल दोन संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करतील.

जाणून घ्या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक –

हे वाचलं का?

राऊंड पहिला –

१७ ऑक्टोबर – ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी आणि बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड

ADVERTISEMENT

१८ ऑक्टोबर – आयर्लंड विरुद्ध नेदरलँड आणि श्रीलंका विरुद्ध नामीबीया

ADVERTISEMENT

१९ ऑक्टोबर – स्कॉटलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी आणि ओमान विरुद्ध बांगलादेश

२० ऑक्टोबर – नामिबीया विरुद्ध नेदरलँड आणि श्रीलंका विरुद्ध आयर्लंड

२१ ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध पापुआ न्यू गिनी आणि ओमान विरुद्ध स्कॉटलंड

२२ ऑक्टोबर – नामीबीया विरुद्ध आयर्लंड आणि श्रीलंका विरुद्ध नेदरलंड

राऊंड दुसरा – Super 12

२३ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज

२४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान

२५ ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध पात्रता फेरीतून येणारा एक संघ

२६ ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड

२७ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध पात्रता फेरीतील संघ आणि पात्रता फेरीतील पहिला संघ विरुद्ध दुसऱ्या गटातील पात्रता फेरीचा संघ

२८ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध पात्रता फेरीचा संघ

२९ ऑक्टोबर – वेस्ट इंडिज विरुद्ध पात्रता फेरीता संघ आणि पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान

३० ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध पात्रता फेरीतला संघ आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

३१ ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध पात्रता फेरीतला संघ आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड

१ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध पात्रता फेरीचा संघ

२ नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध पात्रता फेरीचा संघ, पाकिस्तान विरुद्ध पात्रता फेरीचा संघ

३ नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध पात्रता फेरीचा संघ आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान

४ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध पात्रता फेरीचा संघ आणि वेस्ट इंडिज विरुद्ध पात्रता फेरीचा संघ

५ नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध पात्रता फेरीचा संघ आणि भारत विरुद्ध पात्रता फेरीचा संघ

६ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

७ नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान आणि पाकिस्तान विरुद्ध पात्रता फेरीतला संघ

८ नोव्हेंबर – भारत विरुद्ध पात्रता फेरीतला संघ

दरम्यान पात्रता फेरीव्यतिरीक्त उर्वरित ८ संघांचीही दोन गटात विभागणी करण्यात आलेली आहे. भारत आणि पाकिस्तान यांना दुसऱ्या गटात स्थान मिळालेलं असून याच गटात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश असणार आहे. पहिल्या गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या संघांना स्थान देण्यात आलं आहे. यंदाची स्पर्धा स्पर्धा युएईत आयोजित होणार असली तरीही आयोजनाचे हक्क हे बीसीसीआयकडेच असणार आहेत.

T-20 World Cup नंतर रवी शास्त्री आणि इतर सहकारी टीम इंडियाची जबाबदारी सोडण्याच्या तयारीत

सध्या अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकात सहभागी होणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं. परंतू अफगाणिस्तान संघाच्या मीडिया मॅनेजरने वृत्तसंस्थेशी बोलत असताना संघ टी-२० विश्वचषकात सहभागी होईल असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT