Madha Lok Sabha 2024 : अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर? जयंत पाटलांनी दिला दुजोरा

मुंबई तक

ADVERTISEMENT

madha lok sabha election 2024 abhijeet patil bjp jayant patil big revealation dhairyshil mohite patil sharad pawar
अभिजित पाटील हे त्यांच्या कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर प्रचारातून अलिप्त झालेले दिसत आहेत.
social share
google news

Jayant Patil on Abhijeet Patil : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार करतात.शरद पवारांसाठी काम करतात म्हणून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे ते एक दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करतील, असे मोठं विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांनी केले आहे.  (madha lok sabha election 2024 abhijeet patil bjp jayant patil big revealation dhairyshil mohite patil sharad pawar) 

ADVERTISEMENT

माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज करकंब पंढरपूर येथे सभा पार पडली. या सभेत जयंत पाटील बोलत होते. खरं तर शनिवार पासून अभिजीत पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु आहे. यावर जाहीर सभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे त्यांच्या कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर प्रचारातून अलिप्त झालेले दिसत आहेत. अभिजित पाटील हे धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार करतात, शरद पवारांसाठी काम करतात म्हणून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे ते का जातायत याची कारण तुम्हाला माहित आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

हे ही वाचा : भाजपने का दिलं तिकीट? अखेर उज्ज्वल निकमांनीच दिलं उत्तर

जयंत पाटील पुढे म्हणाले, त्यांना (अभिजीत पाटील) जाऊ द्या काही बिघडत नाही. पण बाकीच्यांनी आता जोरात तुतारी वाजवायची आहे. एवढी जोरात तुतारी वाजवा की अभिजित पाटलांना घेऊन देखील त्यांना काहीच फायदा झाला नाही पाहिजे, असा विश्वास देखील जयंत पाटलांनी मतदारांमध्ये भरला. अभिजीत पाटील नाईलाजाने तिकडे जातायत. आता मोदींच्या सभेत प्रवेश होतोय की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेत प्रवेश होतोय, ते मला माहित नाही, असे देखील जयंत पाटील म्हणाले. 

हे वाचलं का?

अभिजीत पाटलांचा भाजप प्रवेश होणार का? असा सवाल पत्रकारांनी फडणवीसांना विचारला होता. यावर फडणवीस म्हणाले, आज कोणाचाही प्रवेश होणार नाही आहे, त्या ठिकाणी फक्त सभा होणार आहे. आणि ज्याप्रमाणे माढ्याला सभा आहे, अकलूजला सभा आहे, त्याप्रमाणेच अकलूजला सभा आहे. तिथे आम्ही सभा घेतोय म्हणून वेगळ आश्चर्य आहे, असं काही नाही आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

हे ही वाचा : माढ्यात मविआला झटका, फडणवीसांनी टाकला मोठा डाव

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT