Ind vs Aus : हार्दिक कर्णधार तर श्रेयस आऊट… टीम इंडियासमोर ऑस्टेलियाचं तगडं आव्हान
Ind vs Aus Odi Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची (India Vs Australia) टेस्ट मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. या मालिकेनंतर आता मिशन वनडे मालिका सुरु होणार आहे.या मालिकेसाठी टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्रांतीवर असणार आहे, त्यामुळे हार्दीक पंड्या (Hardik Pandya) संघाचे नेतृत्व करणार […]
ADVERTISEMENT
Ind vs Aus Odi Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची (India Vs Australia) टेस्ट मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. या मालिकेनंतर आता मिशन वनडे मालिका सुरु होणार आहे.या मालिकेसाठी टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्रांतीवर असणार आहे, त्यामुळे हार्दीक पंड्या (Hardik Pandya) संघाचे नेतृत्व करणार आहे. तर दुखापतीमुळे श्रेयस अय्यर सीरीजमधून आऊट होणार आहे. त्यामुळे ऑस्टेलियाविरूद्ध वनडे सीरीजचं टीम इंडियासमोर तगडं आव्हान असणार आहे.(ind vs aus odi series team india captain hardik pandya rohit sharma shreyas iyer injury)
ADVERTISEMENT
दोन्ही संघाचे कर्णधार बदलणार
ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सीरीजमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्रांतीवर जाणार आहे. त्यामुळे हार्दीक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. फक्त पहिल्याच सामन्यात हार्दीक कर्णधार असणार आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी रोहित परतणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचं नाही तर ऑस्ट्रेलियाचाही कर्णधार बदलला जाणार आहे. पॅट कमिन्सच्या आईचे निधन झाले असल्याने तो या सीरीजसाठी उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्टिव्ह स्मिथवर असणार आहे.
वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा नसणार कर्णधार; सुनील गावस्करांचं मोठं विधान
हे वाचलं का?
श्रेयस अय्यर आऊट
श्रेयस अय़्यर (Shreys Iyer) या वनडे सीरीजमधून आऊट झाला आहे. अहमदाबाद टेस्टमध्ये अय्यरला दुखापत झाली होती. त्यामुळे वनडे मालिका तो खेळू शकणार नाही आहे.त्याच्याजागी आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळते, हे पाहावे लागणार आहे.
Ind Vs Aus ODI series : टेस्टनंतर ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेतही झटका
ADVERTISEMENT
…तर ऑस्ट्रेलिया नंबर वन
टीम इंडिया सध्या रॅकिंगमध्ये नंबर वन आहे, तर ऑस्ट्रेलिया नंबर 2 आहे. या दोघांमध्ये निव्वळ 2 पॉईंटचे अंतर आहे. जर ऑस्ट्रेलियाने वनडे सीरीज जिंकली तर टीम इंडियाच पहिले स्थान हिरावल जाईल. दोन्ही संघातील याधीची वनडे सीरीज पाहिल्यास त्यामध्ये भारताचा 2-1 ने पराभव झाला होता.
ADVERTISEMENT
हेड टू हेड…
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)यांच्यात आतापर्यंत 143 सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये 80 सामने ऑस्ट्रेलियाने तर 53 सामने भारताने जिंकले आहेत. भारतीय मैदानावर खेळवल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायच झालं तर दोन्ही संघ 64 वेळा आमने सामने आले आहेत.यामध्ये ऑस्ट्रेलियाने 30 वेळा तर भारताने 29 वेळा सामने जिंकले आहेत.
WTC Final: ओव्हलच्या मैदानाने वाढवली भारताची चिंता, आकडेवारी काय सांगते?
वनडे सीरीजचे वेळापत्रक
-
पहिला सामना : 17 मार्च शुक्रवार मुंबई
-
दुसरा सामना : 19 मार्च, रविवार विशाखापट्टणम
-
तिसरा सामना : 22 मार्च बुधवार, चेन्नई
दोन्ही संघाचे प्लेईंग इल्वेहन
ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन (विकेटकिपर), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT