Ind vs Aus : जो रुटची चेन्नईत डबल सेंच्युरी
जो रुटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या टीमने चेन्नई टेस्टवर आपलं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आहे. भारतीय बॉलर्सची धुलाई करत इंग्लंडने ४०० रन्सचा टप्पा ओलांडला असून कॅप्टन जो रुटने आपली डबल सेंच्युरी पूर्ण केली आहे. टेस्ट करिअरमधली १०० वी मॅच खेळणाऱ्या रुटने द्विशतक झळकावत स्वतःचा फॉर्म सिद्ध केला आहे. रविचंद्रन आश्विनच्या बॉलिंगवर सिक्स लगावत रुटने आपलं द्विशतक झळकावलं. […]
ADVERTISEMENT
जो रुटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या टीमने चेन्नई टेस्टवर आपलं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आहे. भारतीय बॉलर्सची धुलाई करत इंग्लंडने ४०० रन्सचा टप्पा ओलांडला असून कॅप्टन जो रुटने आपली डबल सेंच्युरी पूर्ण केली आहे. टेस्ट करिअरमधली १०० वी मॅच खेळणाऱ्या रुटने द्विशतक झळकावत स्वतःचा फॉर्म सिद्ध केला आहे. रविचंद्रन आश्विनच्या बॉलिंगवर सिक्स लगावत रुटने आपलं द्विशतक झळकावलं. अशी कामगिरी करणारा तो पहिला इंग्लिश खेळाडू ठरला आहे.
ADVERTISEMENT
JOE ROOT is the first England player to bring up his double century with a SIX in Test cricket. #INDvENG
— Sampath Bandarupalli (@SampathStats) February 6, 2021
पहिल्या दिवशी ३ विकेट गमावत २६३ रन्सपर्यंत मजल मारलेल्या इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या खेळावरही आपलं वर्चस्व गाजवलं. रुट आणि बेन स्टोक्स यांनी एक सेशन खेळून काढत इंग्लंडला ३५० रन्सचा टप्पा ओलांडून दिला. भारतीय बॉलर्सचे सर्व प्रयत्न या दोन्ही बॅट्समननी हाणून पाडले. दरम्यान खराब फिल्डींगनेही टीम इंडियाच्या अडचणींमध्ये भर घातली.
दरम्यान बेन स्टोक्सनेही आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेत टीम इंडियाच्या बॉलर्सवर हल्लाबोल चढवला. ११८ बॉलमध्ये स्टोक्सने १० फोर आणि ३ सिक्स लगावत ८२ रन्स केल्या. स्टोक्स आपली सेंच्युरी पूर्ण करणार असं वाटत असतानाच नदीमने त्याला आऊट केलं. मात्र स्टोक्स माघारी गेल्यानंतरही रुटने सामन्यावर बसलेली पकड कमी होऊन दिली नाही. त्याने पोपच्या साथीने फटकेबाजी सुरु ठेवत द्विशतक झळकावलं. दुसऱ्या दिवशी टी सेशनपर्यंत इंग्लंडने ४ विकेट्स गमावत ४५४ रन्सपर्यंत मजल मारली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT